ई – पॉस मशिनच्या सर्व्हर एररचा प्रश्न निकाली काढा

अन्यथा धान्य दुकान फोडून जनतेस धान्य देऊ ; बाबुराव धुरींचा इशारा दोडामार्ग – वार्ताहर राष्ट्रीयअन्न सुरक्षा योजनेचे सर्व लाभार्थी यांना ई – पॉस मशिन‌द्वारे ऑनलाईन धान्य वितरित करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधुन ई -पॉस मशिनला वारंवार सर्व्हर एरर येत आहे. त्यामुळे ई पॉस मशिनला येणारा सर्व्हर एरर तात्काळ दूर करणेबाबत आवश्यक कार्यवाही करून […]

ई – पॉस मशिनच्या सर्व्हर एररचा प्रश्न निकाली काढा

अन्यथा धान्य दुकान फोडून जनतेस धान्य देऊ ; बाबुराव धुरींचा इशारा
दोडामार्ग – वार्ताहर
राष्ट्रीयअन्न सुरक्षा योजनेचे सर्व लाभार्थी यांना ई – पॉस मशिन‌द्वारे ऑनलाईन धान्य वितरित करण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधुन ई -पॉस मशिनला वारंवार सर्व्हर एरर येत आहे. त्यामुळे ई पॉस मशिनला येणारा सर्व्हर एरर तात्काळ दूर करणेबाबत आवश्यक कार्यवाही करून सोमवार पर्यंत हा प्रश्न निकाली काढावा अन्यथा धान्य दुकान फोडून जनतेस धान्य जनतेस देण्यात येईल असा इशारा उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी दिला आहे. त्यामुळे तहसीलदार दोडामार्ग यांनी याबाबत गांभीर्याने घेऊन हा प्रश्न निकाली काढावा अशीही मागणी श्री. धुरी यांनी केली आहे.
ई पॉस मशिनला वारंवार सर्वर एरर येत असलेमुळे लाभार्थी यांना धान्य वितरण करणेस, धान्य दुकानदार यांना अडचण निर्माण होत असुन त्यामुळे धान्य दुकानदार यांना लाभार्थी यांचा रोष पत्करावा लागत आहे. धान्य दुकानदार हे सर्वर एररमुळे लाभार्थी यांना ऑनलाईन धान्य वितरीत करु शकत नाहीत. परंतु लाभार्थी यांना धान्य दुकानदार है धान्य मंजुर असुनही धान्य देत नसलेचा गैरसमज होवुन धान्य दुकानदार व लाभार्थी यांचेमध्ये वादविवाद होत असलेचे निदर्शनास येत आहे. धान्य वितरण हे मुदतीत करणेचे असल्याने एररमुळे धान्य दुकानदार यांना धान्य वितरण करणेस विलंब होत आहे. त्यामुळे येत्या सोमवारी पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करून जनतेस धान्य वितरित करण्यात यावे अन्यथा शिवसेना स्टाईल ने धान्य दुकान फोडून जनतेस धान्य वितरित करण्यात येईल असा श्री. धुरी यांनी दिला आहे. या संदर्भात माहिती विचारण्यासाठी तहसीलदार अमोल पोवार यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तेही फोन उचलत नसल्याचे धुरी यांनी यावेळी सांगितले आहे. आहे.