आमची लाईट सुरु करा ,अन्यथा सावंतवाडी तालुक्याचा वीज पुरवठा बंद करा

बावळाट , माडखोल, सातोळी ग्रामस्थांचा सावंतवाडी महावितरणसमोर ठिय्या सावंतवाडी | प्रतिनिधी सह्याद्री पट्ट्यातील सर्व गावे गेले पंधरा दिवस अंधारात आहेत. वीज पुरवठा आज सुरू होईल उद्या सुरू होईल असे आश्वासन फक्त वीज वितरण अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सातोळी, बावळट, माडखोल भागातील ग्रामस्थांनी संतप्त होत वीज अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले . पोलिसांच्या […]

आमची लाईट सुरु करा ,अन्यथा सावंतवाडी तालुक्याचा वीज पुरवठा बंद करा

बावळाट , माडखोल, सातोळी ग्रामस्थांचा सावंतवाडी महावितरणसमोर ठिय्या
सावंतवाडी | प्रतिनिधी
सह्याद्री पट्ट्यातील सर्व गावे गेले पंधरा दिवस अंधारात आहेत. वीज पुरवठा आज सुरू होईल उद्या सुरू होईल असे आश्वासन फक्त वीज वितरण अधिकाऱ्यांकडून दिले जात आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या सातोळी, बावळट, माडखोल भागातील ग्रामस्थांनी संतप्त होत वीज अधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले . पोलिसांच्या मध्यस्थीमुळे संतप्त ग्रामस्थ शांत झाले. वीज कार्यालय येथे शेकडो ग्रामस्थ आपल्या भावना व्यक्त करत होते. आम्ही तुमच्याकडे वीज पुरवठा सुरळीत करा यासाठी वारंवार विनंती करतो आहे. परंतु ,तुम्ही कोणतीच दखल घेत नाहीत ,आमची लाईट सुरु करा अन्यथा संपूर्ण सावंतवाडी तालुक्याचा वीज पुरवठा बंद करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली . तसेच वीज कर्मचारी हनपाडे यांच्यावर कारवाई करा अशी मागणीही केली. अखेर तब्बल तीन तासानंतर गावात वीज पुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.