बांद्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास निर्मूलन फवारणी करा

अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांचे बांदा सरपंचांना निवेदन प्रतिनिधी बांदा बांदा शहरात पुराचे पाणी शिरल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरातील पूर बाधित क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया या जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी शहरात डास निर्मूलन फवारणी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात […]

बांद्यात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डास निर्मूलन फवारणी करा

अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांचे बांदा सरपंचांना निवेदन
प्रतिनिधी
बांदा
बांदा शहरात पुराचे पाणी शिरल्याने साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यासाठी शहरातील पूर बाधित क्षेत्रात डेंग्यू, मलेरिया या जीवघेण्या आजारांपासून वाचण्यासाठी शहरात डास निर्मूलन फवारणी करावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे. त्यांनी यासंदर्भात बांदा सरपंच यांना निवेदन दिले आहे.निवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, पावसाळ्यात दरवर्षी बांदा शहराला तेरेखोल नदीच्या पुराच्या पाण्याचा फटका बसतो. पूर बाधित क्षेत्रात साथीच्या रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पावसाळा सुरु असून नागरिकांची अशा रोगांपासून मुक्तता होण्यासाठी डास निर्मूलन होणे ही काळाची गरज आहे. यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने शहरात पूर बाधित क्षेत्रासह सर्वत्र डास फवारणी मोहीम लवकरात लवकर राबवावी.