ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी यांची निवड
तर रुपेश राऊळ सावंतवाडी विधानसभा प्रमुख ; महिला संघटकपदी सुकन्या नरसुले
सावंतवाडी । प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बाबासाहेब ठाकरे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत . उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तर सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संपवण्यात आली आहे. धुरी हे सावंतवाडी, वेंगुर्ला ,दोडामार्ग ,कुडाळ तालुक्याचे जिल्हाप्रमुख असणार आहेत . आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन ठाकरे शिवसेनेत खातेपालट करण्यात आली आहे. महिला संघटक म्हणून सुकन्या नरसुले यांची निवड करण्यात आली आहे. या निवडी नुकत्याच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कडून जाहीर करण्यात आल्या आहेत .धुरी हे यापुर्वी दोडामार्ग येथील उपजिल्हाप्रमुख या पदावर होते. त्यांना बढती देऊन जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती देण्यात आली आहे. तर राऊळ हे सावंतवाडी तालुकाप्रमुख होते. त्यांना सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदी बढती देण्यात आले आहे. राऊळ हे बारा वर्षे सावंतवाडी तालुकाप्रमुख म्हणून काम करत होते. तर बाबुरव धुरी हे दोडामार्ग तालुकाप्रमुख त्यानंतर उपजिल्हाप्रमुख पदावर काम करत होते. राऊळ आणि धुरी हे दोघेही पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजय पडते यांना सहसंपर्कप्रमुख पदी (सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले आणि कुडाळ तालुका) बढती देण्यात आली आहे. ते जिल्हाप्रमुख पदी काम करत होते. सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुखपदी कालिदास कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. या पदावर पद मुंबई मनपाचे माजी नगरसेवक शैलेश परब होते. त्यांना अंधेरी जोगेश्वरी विधानसभा मतदारसंघाकडे लक्ष देण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सावंतवाडी विधानसभा महिला संघटकपदी वेंगुर्ले येथील सौ. सुकन्या नरसुले (सावंतवाडी विधानसभा). यांना संधी देण्यात आली आहे. त्या जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या आहेत.विधानसभा मतदारसंघ निवडणुकांसाठी हा फेरबदल करण्यात आला. आता राहुल यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड झाल्याने सावंतवाडी तालुका प्रमुख निवडण्याची जबाबदारी नव्या जिल्हाप्रमुखांकडे येणार आहे यांच्यामार्फत नवीन नाव पक्षप्रमुखांकडे पाठवण्यात येणार आहे या पदावर तालुका संघटक मायकल डिसोजा उपतालुकाप्रमुख विष्णू उर्फ आबा सावंत तालुकाप्रमुख पदासाठी दावेदार मानले जात आहेत.
Home महत्वाची बातमी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी यांची निवड
ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुखपदी बाबुराव धुरी यांची निवड
तर रुपेश राऊळ सावंतवाडी विधानसभा प्रमुख ; महिला संघटकपदी सुकन्या नरसुले सावंतवाडी । प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बाबासाहेब ठाकरे शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आले आहेत . उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यावर जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी तर सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी संपवण्यात आली आहे. […]