झाराप येथे दुचाकीवरून पडून महिला जखमी

सावंतवाडी । प्रतिनिधी : मुंबई गोवा महामार्गावरून मालवणवरून मातोंड येथील नातेवाईकांकडे जात असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने रस्त्यावर पडून महिला जखमी झाली. झाराप झिरो पॉईंट येथे आज दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. जयश्री भागोजी पेंडुरकर ( ४०, पेंडुर, खरारेवाडी ) असे तिचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ राजू तेंडुलकर तसेच उत्तम डिचोलकर यांनी तिला […]

झाराप येथे दुचाकीवरून पडून महिला जखमी

सावंतवाडी । प्रतिनिधी :
मुंबई गोवा महामार्गावरून मालवणवरून मातोंड येथील नातेवाईकांकडे जात असताना दुचाकी खड्ड्यात गेल्याने रस्त्यावर पडून महिला जखमी झाली. झाराप झिरो पॉईंट येथे आज दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. जयश्री भागोजी पेंडुरकर ( ४०, पेंडुर, खरारेवाडी ) असे तिचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थ राजू तेंडुलकर तसेच उत्तम डिचोलकर यांनी तिला आपल्या खाजगी गाडीने उपचारार्थ सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.