सावंतवाडीतील २ कुटुंबाना नगरपालिकेकडून स्थलांतराची नोटीस
नरेंद्र डोंगराचा काही भाग खचल्याने ऐन पावसाळ्यात शाळांमध्ये स्थलांतर होण्याची कुटुंबावर वेळ
सावंतवाडी । प्रतिनिधी
सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगररचना विभागाने सालईवाड्यातील दोन कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे. शहरातील शाळांमध्ये या कुटुंबांना स्थलांतरित होण्याबाबत पालिकेने त्यांना कळवले आहे. नरेंद्र डोंगराचा काही भाग खचल्याने त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . या ठिकाणी नगरपरिषदेची पाईपलाईन जाते. ही पाईपलाईन फुटल्याने डोंगराचा भाग खचला आणि तेथील रहिवाशांच्या घरापर्यंत मातीचे ढिगारे आले. परंतु ,नगरपरिषदेने या कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावल्याने ऐन पावसाळ्यात जीवनावश्यक साहित्यासह स्थलांतर कसे करावे असा प्रश्न या कुटुंबांसमोर उभा राहिला आहे.
नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी या दोन कुटुंबांसह स्थानिक नागरिकांची घरे आहेत. ही घरे रीतसर परवाना घेऊन बांधण्यात आली. गेली काही वर्षे ही कुटुंब तेथे राहतात .परंतु अलीकडे नगर परिषदेची पाईपलाईन फुटली. त्यामुळे मोठ्या पाण्याच्या प्रवाहामुळे नरेंद्र डोंगराचा काही भाग खचला . खचलेल्या डोंगराची माती या कुटुंबांच्या घरापर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळे या कुटुंबीयांना धोकादायक वातावरण आहे. त्यामुळे नगर परिषदेच्या नगररचना विभागाने या कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे. शहरातील शाळांमध्ये या कुटुंबांना स्थलांतरित करण्यास सांगण्यात आले आहे. परंतु ऐन पावसाळ्यात जीवनावश्यक साहित्याचे स्थलांतर कसे करावे असा प्रश्न या कुटुंबासमोर उभा राहिला आहे. तर डोंगर खचून या कुटुंबांना धोका उत्पन्न होण्याची भीती पालिकेला आहे . सावंतवाडीत डोंगर खचल्यानंतर नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी असा प्रकार घडला नव्हता. सावंतवाडी शहराला लागून नरेंद्र डोंगर आहे. या नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी शहर वसलेले आहे ते पाहता आता भविष्यात नरेंद्र डोंगराच्या ठिकाणी कुठल्याही कामासाठी खुदाई होत असेल तर सावंतवाडी शहराच्या दृष्टीने भविष्यात तो धोका ठरेल.
Home महत्वाची बातमी सावंतवाडीतील २ कुटुंबाना नगरपालिकेकडून स्थलांतराची नोटीस
सावंतवाडीतील २ कुटुंबाना नगरपालिकेकडून स्थलांतराची नोटीस
नरेंद्र डोंगराचा काही भाग खचल्याने ऐन पावसाळ्यात शाळांमध्ये स्थलांतर होण्याची कुटुंबावर वेळ सावंतवाडी । प्रतिनिधी सावंतवाडी नगरपरिषदेच्या नगररचना विभागाने सालईवाड्यातील दोन कुटुंबांना स्थलांतराची नोटीस बजावली आहे. शहरातील शाळांमध्ये या कुटुंबांना स्थलांतरित होण्याबाबत पालिकेने त्यांना कळवले आहे. नरेंद्र डोंगराचा काही भाग खचल्याने त्यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत . या ठिकाणी नगरपरिषदेची पाईपलाईन जाते. ही पाईपलाईन फुटल्याने […]