साटेली – भेडशीत ३ दुकानातील रक्कम चोरट्यांकडून लंपास
साटेली – भेडशी – प्रतिनिधी
दोडामार्ग तालुक्यातील साटेली – भेडशी वरचा बाजार येथील तीन दुकानातील रक्कम भुरट्या चोरांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती अशी की, वरचा बाजार येथील एक पान स्टॉल, दोन हॉटेल मध्ये सोमवारी रात्री चोरांनी शिरकाव केला. त्यांनी दुकानाचे गल्ले फोडले . यामध्ये त्यांना चिल्लर रक्कम मिळाली. शे दोनशे रुपयांची चिल्लर घेऊन गेलेले चोर भुरटे असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी शोध मोहीम घेणे आवश्यक असून बाजारपेठेतील बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करण्याची मागणी होत आहे.
Home महत्वाची बातमी साटेली – भेडशीत ३ दुकानातील रक्कम चोरट्यांकडून लंपास
साटेली – भेडशीत ३ दुकानातील रक्कम चोरट्यांकडून लंपास
साटेली – भेडशी – प्रतिनिधी दोडामार्ग तालुक्यातील साटेली – भेडशी वरचा बाजार येथील तीन दुकानातील रक्कम भुरट्या चोरांनी लंपास केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबतची माहिती अशी की, वरचा बाजार येथील एक पान स्टॉल, दोन हॉटेल मध्ये सोमवारी रात्री चोरांनी शिरकाव केला. त्यांनी दुकानाचे गल्ले फोडले . यामध्ये त्यांना चिल्लर रक्कम मिळाली. शे दोनशे […]