केदार टेमकर यांनी साकारली विठुरायाची पाण्यावरील रांगोळी

सावंतवाडी आषाढी एकादशीच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीचे कला शिक्षक केदार टेमकर यांनी विद्यार्थ्यांसोबत वारकरी व विठुरायाची पाण्यावरील रांगोळी अवघ्या दीड तासात साकारली. रांगोळीचा रेखाटत असताना रंगांची माहिती तसेच पाण्यावर रांगोळी टाकता येण्यासाठी वापरले जाणारे तंत्र याची विशिष्ट माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. ”याची देही याची डोळा ””विद्यार्थ्यांनी पाण्यावरील रांगोळीचा […]

केदार टेमकर यांनी साकारली विठुरायाची पाण्यावरील रांगोळी

सावंतवाडी
आषाढी एकादशीच्या निमित्ताने कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय. बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीचे कला शिक्षक केदार टेमकर यांनी विद्यार्थ्यांसोबत वारकरी व विठुरायाची पाण्यावरील रांगोळी अवघ्या दीड तासात साकारली. रांगोळीचा रेखाटत असताना रंगांची माहिती तसेच पाण्यावर रांगोळी टाकता येण्यासाठी वापरले जाणारे तंत्र याची विशिष्ट माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. ”याची देही याची डोळा ””विद्यार्थ्यांनी पाण्यावरील रांगोळीचा आनंद लुटला. प्रशालेचे प्राध्यापक ,सहकारी शिक्षक वर्ग आणि संस्थेने हा उपक्रम राबवण्यासाठी सहकार्य केले.