राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय भोसले मैदानात !

सावंतवाडी तालुक्यात नारायण राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले हे पदाधिकाऱ्यांसोबत मैदानात उतरले असून त्यांनी तालुक्यातील दुर्गम गावात जाऊन प्रचार यंत्रणा राबविली आहे . यामध्ये असनिये, ओटवणे, वेर्ले, अंबोली, कुंभवडे, चौकूळ, मडुरा, कास, बांदा, सांगेली या भागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार यंत्रणा राबवत आहेत. केंद्र आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष आहे. […]

राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय भोसले मैदानात !

सावंतवाडी तालुक्यात नारायण राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले हे पदाधिकाऱ्यांसोबत मैदानात उतरले असून त्यांनी तालुक्यातील दुर्गम गावात जाऊन प्रचार यंत्रणा राबविली आहे . यामध्ये असनिये, ओटवणे, वेर्ले, अंबोली, कुंभवडे, चौकूळ, मडुरा, कास, बांदा, सांगेली या भागातील कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार यंत्रणा राबवत आहेत.
केंद्र आणि महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष आहे. तर मोदी सरकारमध्ये राष्ट्रवादी पक्षाला मानाचे स्थान देण्यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी महायुतीमध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उदय भोसले यांनी केले . तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व प्रदेश चिटणीस श्री सुरेश गवस यांनी जुन्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. शेतकरी आणि बागायतदारांची चर्चा करून नारायण राणे यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या प्रचारामध्ये तालुकाध्यक्ष उदय भोसले ,प्रदेश चिटणीस सुरेश गवस, असलम खतीब, सतीश नाईक, सावंतवाडी महिला तालुकाध्यक्ष रिद्धी परब, विजय कदम, विलास पावसकर, प्रभाकर गावकर, बाळकृष्ण नाईक ,रूपाली मिस्त्री, एम.डी. सावंत तसेच कुंभवडे ,सत्यप्रकाश गावडे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.