सरमळेत तेरेखोल नदीलगतचा बांदा – दाणोली जिल्हा मार्ग खचला

जिल्हा मार्गाला धोका एकेरी वाहतूक सुरू ओटवणे प्रतिनिधी सरमळे – गावातून जाणाऱ्या बांदा – दाणोली या प्रमुख जिल्हा मार्गालगतची दरड लगतच्या तेरेखोल नदीच्या पात्रात शुक्रवारी सायंकाळी कोसळली. त्यामुळे या महत्त्वाच्या जिल्हा मार्गाला ऐन पावसाळ्यातच धोका निर्माण झाला आहे. सध्या या जिल्हा मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत तात्काळ उपायोजना न केल्यास हा […]

सरमळेत तेरेखोल नदीलगतचा बांदा – दाणोली जिल्हा मार्ग खचला

जिल्हा मार्गाला धोका एकेरी वाहतूक सुरू
ओटवणे प्रतिनिधी
सरमळे – गावातून जाणाऱ्या बांदा – दाणोली या प्रमुख जिल्हा मार्गालगतची दरड लगतच्या तेरेखोल नदीच्या पात्रात शुक्रवारी सायंकाळी कोसळली. त्यामुळे या महत्त्वाच्या जिल्हा मार्गाला ऐन पावसाळ्यातच धोका निर्माण झाला आहे. सध्या या जिल्हा मार्गावर एकेरी वाहतूक सुरू असून सार्वजनिक बांधकाम खात्याने याबाबत तात्काळ उपायोजना न केल्यास हा रस्ताच तेरेखोल नदीपात्रात कोसळून हा जिल्हा मार्ग ठप्प होण्याची भीती आहे.बांदा – दाणोली या प्रमुख जिल्हा मार्गावर सरमळे सपतनाथ मंदिर परिसरात या जिल्हा मार्गाला लागूनच वाहणारी तेरेखोल नदी नेहमीच धोक्याच्या पातळीवरून वाहते. गेल्या अनेक वर्षांपासून या तेरेखोल नदी किनाऱ्यालगत संरक्षक भिंतीसह कठडा बांधण्याची मागणी आहे. मात्र याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्यामुळेच हा प्रकार घडला.