तामिळ थलैवाजचा बेंगळूरवर विजय

वृत्तसंस्था/ हैद्राबाद 2024 च्या प्रो-कबड्डीr लिग हंगामातील येथे झालेल्या सामन्यात तामिळ थलैवाजने बेंगळूर बुल्सचा 45-28 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात तामिळ थलैवाजच्या नरेंद्र आणि अजिंक्य पवार यांनी अनुक्रमे 14 आणि 11 गुणांची नोंद केली. या सामन्यात तामिळ थलैवाजचा कर्णधार सागरने 5 टॅकल गुण मिळविले. बेंगळूर बुल्सतर्फे अक्षितने आपल्या चढायांवर 12 गुण घेतले. पहिल्या 15 […]

तामिळ थलैवाजचा बेंगळूरवर विजय

वृत्तसंस्था/ हैद्राबाद
2024 च्या प्रो-कबड्डीr लिग हंगामातील येथे झालेल्या सामन्यात तामिळ थलैवाजने बेंगळूर बुल्सचा 45-28 अशा गुणांनी पराभव केला. या सामन्यात तामिळ थलैवाजच्या नरेंद्र आणि अजिंक्य पवार यांनी अनुक्रमे 14 आणि 11 गुणांची नोंद केली.
या सामन्यात तामिळ थलैवाजचा कर्णधार सागरने 5 टॅकल गुण मिळविले. बेंगळूर बुल्सतर्फे अक्षितने आपल्या चढायांवर 12 गुण घेतले. पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीतच तामिळ थलैवाजने बेंगळूर बुल्सचे पहिल्यांदा सर्व गडी बाद केले. नरेंद्र आणि अजिंक्य हे तामिळ थलैवाजच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मध्यंतरापर्यंत तामिळ थलैवाजने बेंगळूरवर 25-14 अशी भक्कम आघाडी घेतली होती. सामन्याच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर बेंगळूर बुल्सच्या हिमांषूने पहिल्यांदा सुपर 10 गुण नोंदविले. दोन मिनिटांच्या कालावधीत बेंगळूर बुल्सचे दुसऱ्यांदा सर्व गडी बाद झाल्याने 5 मिनिटे बाकी असताना तामिळ थलैवाजने बेंगळूरवर 31-23 अशी आघाडी घेतली होती. नरेंद्र आणि अजिंक्य यांनी या सामन्यात सुपर 10 गुण नोंदविले.