उचगावात हमी सभेचे तालुकास्तरीय आयोजन
गॅरंटी योजना यशस्वी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा दावा : महिलांची लक्षणीय उपस्थिती
वार्ताहर /उचगाव
आमच्या काँग्रेस पक्षाने राज्यातील सात कोटी जनतेला पाच गॅरंटी योजनाचे वचन दिले होते, ते आम्ही पूर्ण केले. गोरगरीब जनतेला गृहलक्ष्मी, गृहज्योती, मोफत बसप्रवास, मोफत रेशन या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही बोलतो तसे वागतो आणि अंमलातही आणतो, असे मनोगत कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उचगाव येथील मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये या हमी योजनांच्या योग्य अंमलबजावणी हमी सभेचे तालुकास्तरीय आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या सभेला बेळगाव तालुक्मयातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे मळेकरणी देवीच्या आमराईच्या प्रवेशद्वारामध्ये आगमन होताच फुलांचा वर्षाव आणि कलशधारी महिला आणि धनगरी ढोलच्या निनादात त्यांची मिरवणुकीद्वारे व्यासपीठापर्यंत आगमन झाले. यानंतर मळेकरणी देवीच्या मंदिरामध्ये जाऊन त्यांनी यथासांग पूजा-अर्चा करून व्यासपीठावर विराजमान झाल्या.
व्यासपीठावर विधानसभा सदस्य चन्नराज हट्टीहोळी, कर्नाटक काँग्रेस युवा उपाध्यक्ष मृणाल हेब्बाळकर, बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम तसेच ग्रामीणचे तहसीलदार सिद्राय भोसगी, योजना पंचायतचे कार्यकारी अधिकारी रामरे•ाr पाटील, महिला व कल्याण विभागाचे उपसंचालक नागराज, हेस्कॉमचे असिस्टंट एझिक्युटिव्ह इंजिनियर विनोद केरूळ, अन्न विभाग सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, सीडीपीओ सुमित्रा यासह उचगाव ग्रा. पं. अध्यक्षा मथुरा तेरसे, उपाध्यक्ष बाळकृष्ण तेरसे तसेच तुरमुरी, सुळगा, बेकिनकेरे, हिंडलगा, बेनकनहळ्ळी आणि इतर ग्रामपंचायतचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यासपीठावर उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत तहसीलदार सिद्राय भोसगी यांनी केले. नागराज यांनी या पाच गॅरंटी योजनांची सविस्तर माहिती दिली. युवराज कदम यांनी मनोगत त्यांनी व्यक्त केले. यावेळी बोलताना चन्नराज हट्टीहोळी म्हणाले, वर्षाला 7 हजार कोटी ऊपये या गॅरंटी योजनेतून आम्ही देत आहोत. तर वर्षाकाठी 3 लाख कोटी बजेट आम्ही मंजूर करून घेतले आहे. आणि ते देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. यामुळेच काँग्रेस पक्षावर आज जनतेचा विश्वास आहे. सूत्रसंचालन पी.डी.ओ. गोपाळ नाईक यांनी केले.
Home महत्वाची बातमी उचगावात हमी सभेचे तालुकास्तरीय आयोजन
उचगावात हमी सभेचे तालुकास्तरीय आयोजन
गॅरंटी योजना यशस्वी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा दावा : महिलांची लक्षणीय उपस्थिती वार्ताहर /उचगाव आमच्या काँग्रेस पक्षाने राज्यातील सात कोटी जनतेला पाच गॅरंटी योजनाचे वचन दिले होते, ते आम्ही पूर्ण केले. गोरगरीब जनतेला गृहलक्ष्मी, गृहज्योती, मोफत बसप्रवास, मोफत रेशन या सर्व योजनांची अंमलबजावणी पूर्ण करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आहोत. आम्ही बोलतो तसे वागतो आणि अंमलातही […]