शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षांमध्ये युतीची शक्यता वाढली; प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये महानगरपालिका निवडणुकांकरिता विशेषतः पुणे आणि मुंबई महापालिका युतीची शक्यता वाढल्याच्या चर्चा जोरात आहे .

शरद पवार आणि अजित पवारांच्या पक्षांमध्ये युतीची शक्यता वाढली; प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांचा मोठा दावा

महाराष्ट्रात शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये महानगरपालिका निवडणुकांकरिता विशेषतः पुणे आणि मुंबई महापालिका युतीची शक्यता वाढल्याच्या चर्चा जोरात आहे .

 

मिळालेल्या माहितीनुसार अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस दत्तात्रय धनकवडे यांनी थेट दावा केला की पुण्यात दोन्ही गट एकत्र येऊ शकतात. अजित पवारांनी पुण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन युतीबाबत निर्णय घेण्याचे संकेत दिले. स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते युतीच्या बाजूने आहे. अशी माहिती समोर येत आहे. 

ALSO READ: मुंबईत मोठी घटना, १८ वर्षीय विद्यार्थ्याला चालत्या ट्रेनमधून ढकलले

तसेच अजित पवार गटाने शरद पवार गटासोबत लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महायुतीत जागावाटपात अडचणी येत असल्याने अजित पवार गटाला शरद पवार गटाची साथ हवी असल्याचे सूत्रांकडून समजते.तसेच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांमुळे,महायुतीचा (भाजप-शिंदे सेना-अजित पवार) दणदणीत विजय झाला, तर महाविकास आघाडी (काँग्रेस-ठाकरे सेना-शरद पवार) कमकुवत ठरली. यामुळे महापालिका निवडणुकांत भाजप-शिंदे सेना युती होऊन अजित पवार गट बाहेर पडण्याची शक्यता वाढली, आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळाले. 

 

अजित पवारांची भूमिका

अजित पवार म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जिल्हास्तरीय निर्णय घेता येतील, आणि महायुतीत असलो तरी स्थानिक राजकीय परिस्थितीनुसार युती शक्य आहे.

 

शरद पवार गटातील काही नेते म्हणजेच पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप युतीला विरोध करत आहे, कारण अजित पवार गट भाजपसोबत आहे. तर शिवसेना नेते संजय युबीटी  राऊत यांनी म्हटले की, अजित पवारांसोबत युती म्हणजे अप्रत्यक्ष भाजपला साथ देणे. शरद पवार यांनी यापूर्वी भाजपसोबत असलेल्या कोणत्याही पक्षाशी युती न करण्याचे संकेत दिले होते, पण स्थानिक निवडणुकांसाठी ते लवचिक असू शकतात.

ALSO READ: अहमदाबादमध्ये विमान धावपट्टीवर आदळले, इंदूरकडे वळवले, नंतर उड्डाण रद्द

सध्या तरी युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही, फक्त चर्चा आणि हालचाली सुरू आहे.  

ALSO READ: Aravalli Mountains अरवली पर्वत धोक्यात आहे का? राजस्थानपासून दिल्लीपर्यंत गोंधळ का?

Edited By- Dhanashri Naik

Go to Source