ताळगाव पंचायतीचे मतदान उद्या

चार उमेदवारांची यापुर्वीच बिनविरोध निवड : सोमवारी मतमोजणी, एकूण मतदार 19 हजार पणजी : ताळगाव पंचायत निवडणूक प्रचार काल शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला असून उद्या रविवार 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 अशी मतदानाची वेळ असून एकूण 19,349 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यात 9206 पुरूष आणि 10143 […]

ताळगाव पंचायतीचे मतदान उद्या

चार उमेदवारांची यापुर्वीच बिनविरोध निवड : सोमवारी मतमोजणी, एकूण मतदार 19 हजार
पणजी : ताळगाव पंचायत निवडणूक प्रचार काल शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता संपुष्टात आला असून उद्या रविवार 28 एप्रिल रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 अशी मतदानाची वेळ असून एकूण 19,349 मतदार मतदानासाठी पात्र आहेत. त्यात 9206 पुरूष आणि 10143 महिला यांचा समावेश आहे. मतपत्रिकेच्या माध्यमातून ही निवडणूक होणार असून ती पक्षीय पातळीवर नाही. एकूण 26 मतदान केंद्रे असून लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार 29 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे. पंचायतीमध्ये एकूण 11 वॉर्ड असून एकूण 4 वॉर्डातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे फक्त एकूण 7 वॉर्डातच निवडणूक होणार असून तेथे सरळ लढती आहेत. वॉड 1 मध्ये सिद्धी केरकर, वॉर्ड 6 मध्ये इस्तेला डिसोझा, वॉर्ड 10 मध्ये सागर बांदेकर तर वॉर्ड 11 मध्ये सिडनी पॉल बार्रेटो हे उमेदवार बिनविरोध आले आहेत. इतर वॉर्डात निवडणूक घेतली जाणार आहे. उमेदवारांना खर्चाची मर्यादा म्हणून रु. 40,000 आखून देण्यात आली आहे. तिसवाडी मामलेदार हे निर्वाचन अधिकारी असून उत्तर गोवा जिल्हाधिकारी हे जिल्हा निवडणूक अधिकारी आहे. पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आपला गट निवडणुकीत उतरवला असून तोच बाजी मारणार अशी चिन्हे आहेत.