देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
भाजपची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : काँग्रेस नेते सैय्यद नासीर हुसेन राज्यसभेवर निवड झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उपस्थितीत विधानसौधमध्ये पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा देऊन देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. देशाच्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानसौधमध्येच काँग्रेस समर्थकांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. याचा निषेध नोंदवत भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून सैय्यद नासीर हुसेन यांचा विजय झाल्यानंतर विधानसौधमध्ये त्यांच्या शेजारी असलेल्या समर्थकांकडून पाकिस्तान समर्थनार्थ घोषणा दिल्या आहेत. त्यांचे समर्थक म्हणजे दहशतवादी असल्याचा आरोप भाजपने केला आहे. देशविरोधी घोषणा देऊन गुन्हा केला आहे. अशा देशद्रोह्यांना त्वरीत अटक करण्यात यावी. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. सर्वांच्या समक्ष देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना कदापीही माफ करण्यात येवू नये, अशा देशद्रोह्यांना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्यास भविष्यामध्ये याचे परिणाम भोगावे लागतील. भविष्यात घडणाऱ्या दुर्घटनेला काँग्रेस सरकार जबाबदार राहिल, असा इशाराही भाजपकडून देण्यात आला आहे.
देशाच्या रक्षणासाठी काँग्रेसने विधानसभेतून पायउतार व्हावे,अशी घोषणाबाजीही करण्यात आली. देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना अटक करुन सैय्यद नासीर हुसेन यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करुन भाजपकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. निदर्शन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरटीओ सर्कल येथील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलनासाठी जात असताना पोलिसांकडून वेळीच ताब्यात घेण्यात आले. यामुळे भर रस्त्यावर मोठा हायड्रामा झाला. भाजप कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार आंदोलन केले. काँग्रेस कार्यालयाकडे जात असताना मराठा मंडळ महाविद्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांना अडविण्यातआले. यावेळी पोलीस व कार्यकर्त्यांवर बाचाबाची झाली. वेळीच सर्व भाजप कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस वाहनांतून त्यांची रवानगी करण्यात आली. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. अनुसुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.
Home महत्वाची बातमी देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
देशविरोधी घोषणा देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करा
भाजपची निदर्शने, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : काँग्रेस नेते सैय्यद नासीर हुसेन राज्यसभेवर निवड झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांकडून त्यांच्या उपस्थितीत विधानसौधमध्ये पाकिस्तान जिंदाबाच्या घोषणा देऊन देशद्रोहाचा गुन्हा केला आहे. देशाच्या लोकशाहीचे मंदिर असणाऱ्या विधानसौधमध्येच काँग्रेस समर्थकांकडून हे कृत्य करण्यात आले आहे. याचा निषेध नोंदवत भाजपतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. राज्यसभेसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत काँग्रेसमधून […]