Nashik News | न्या. चपळगांवकरांचा कार्यकाळ संपल्याने वसंत डहाके अध्यक्षपदी

नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवी वसंत आबाजी डहाके यांची निवड करण्यात आली आहे. न्या. नरेंद्र चपळगांवकर यांचा कार्यकाळ संपल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. डहाके पुढील पाच वर्षे अध्यक्षपद सांभाळणार आहेत. वसंत आबाजी डहाके हे मराठी भाषातज्ज्ञ, लेखक आणि कवी आहेत आणि त्यांनी साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त केला आहे.