वाल्मिकी निगम भ्रष्टाचार आरोपींवर कारवाई करा

वाल्मिकी राज्य युवा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : महर्षी वाल्मिकी विकास निगममध्ये 187 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या निगममधील अधिकारी आणि राजकारण्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत कर्नाटक अनुसूचित जाती-जमाती वाल्मिकी राज्य युवा संघटनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. वाल्मिकी विकास निगममध्ये 187 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सखोल […]

वाल्मिकी निगम भ्रष्टाचार आरोपींवर कारवाई करा

वाल्मिकी राज्य युवा संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : महर्षी वाल्मिकी विकास निगममध्ये 187 कोटींचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे. यामध्ये सहभागी असणाऱ्या निगममधील अधिकारी आणि राजकारण्यांवर कायदेशीर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करत कर्नाटक अनुसूचित जाती-जमाती वाल्मिकी राज्य युवा संघटनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. वाल्मिकी विकास निगममध्ये 187 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, या भ्रष्टाचार प्रकरणामुळे अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सरकारी सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. या निगमच्या माध्यमातून अनुसूचित जाती-जमातीच्या नागरिकांकडून विविध योजनांसाठी अर्जांचे आवाहन केले जाते. मात्र, झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणांमुळे या योजनांपासून नागरिकांना मिळणारा लाभ होईना झाला आहे. तसेच योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अवलंबिले जाणारे विलंब धोरण नागरिकांच्या विकासाला मारक ठरले आहे.
मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून द्या
अर्ज केल्यानंतर लाभार्थ्यांना योजनेचा लाभ मिळविण्यासाठी 3 ते 4 वर्षे कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागतात, अशी परिस्थिती असताना निगमचे अधिकारी आणि राजकारण्यांकडून केलेल्या भ्रष्टाचारामुळे मागासवर्गीय समाजावर अन्याय केला आहे. सदर व्यक्तींची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी. मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी असणाऱ्या योजनांच्या निधीमधील झालेला भ्रष्टाचार समाजाच्या विकासाला मारक ठरणार आहे. सदर निधी त्वरित निगममध्ये जमा करून मागासवर्गीय समाजाला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी महेश शिगीहळ्ळी, मल्लेश मुळगसी, रामू पुजारी, लगमण्णा हुन्नंगी, राजशेखर हिंडलगी, द्यामण्णा तळवार, मंजू तळवार, आनंद उदी, बाबू हत्तरवाड आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.