हुपरीतील स्वरूप प्रवीण शेटे यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती

हुपरी प्रतिनिधी मन लावून कोणतीही गोष्ट केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. स्वरूपला आई, वडिलांची चांगल्या प्रकारे मिळालेली साथ आणि त्याची शिखर गाठण्याची जिद्द व हातात घेतलेले काम पूर्ण करण्याची चिकाटी हे सर्व गुण स्वरूपच्या अंगी असल्याने तो लेफ्टनंट झाला. कायदा काळ्या शाईने लिहिताना जी पांढरी जागा रहाते ती जागा माणुसकीने भरल्यास निश्चितपणे यशस्वी व्हाल असे […]

हुपरीतील स्वरूप प्रवीण शेटे यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती

हुपरी प्रतिनिधी
मन लावून कोणतीही गोष्ट केल्यास त्यात नक्कीच यश मिळते. स्वरूपला आई, वडिलांची चांगल्या प्रकारे मिळालेली साथ आणि त्याची शिखर गाठण्याची जिद्द व हातात घेतलेले काम पूर्ण करण्याची चिकाटी हे सर्व गुण स्वरूपच्या अंगी असल्याने तो लेफ्टनंट झाला. कायदा काळ्या शाईने लिहिताना जी पांढरी जागा रहाते ती जागा माणुसकीने भरल्यास निश्चितपणे यशस्वी व्हाल असे प्रतिपादन जगदीश जगताप (आयकर उपायुक्त ,कोल्हापूर) यांनी केले.
हुपरी (ता. हातकणंगले ) येथील रजत एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात हुपरीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवून गगन भरारी मारणारे स्वरूप प्रवीण शेटे यांची त्रिपुरा आगरतळा येथे भारतीय सैन्य दलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल पास्ट रोटरॅकट क्लब ऑफ हुपरीच्या वतीने आयोजित केलेल्या” गौरव सोहळा” समारंभात बोलत होते.
प्रथम उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन पांडुरंग मुळीक, प्रदीप ठोंबरे यांनी स्वागत केले त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.यानंतर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे म्हणाले आपल्या मुलाला अथवा मुलीला जिद्दीने चांगल्या पदावर पोहचविण्यासाठी प्रथम आई वडीलच गुरू असतात. आदर्श आणि चांगल्या व्यक्तीची सोबत असेल तर मनातील सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होण्यास अडथळा निर्माण होणार नाही याची मला खात्री आहे. स्वरूपला आई-वडीलांची साथ व आशीर्वाद मिळाल्याने गगन भरारी मारून लेफ्टनंट पदावर जाऊन पोहचला आहे. यानंतर लेफ्टनंट स्वरूप प्रवीण शेटे म्हणाले की कोणतीही गोष्ट मनःपूर्वक केल्यास त्यात यश प्राप्त होते मात्र एखादी गोष्ट हाती घेतली ती पूर्ण केल्याशिवाय दुसऱ्या गोष्टींचा विचार करता कामा नये. पालकांनी आपल्या मुलांच्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. हे टेक्नॉलॉजी युग आहे यात प्रयत्न केल्यास यश नक्कीच येणार याची मला खात्री झाली आहे.
यानंतर वडील प्रवीण शेटे, आई सुजाता शेटे, हर्षवर्धन शेटे, वर्ध कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून जीवनात आलेल्या खडतर अडचणी संदर्भात सांगितले.यावेळी पास्ट रोटरॅकट क्लब ऑफ हुपरीच्या वतीने प्रदीप ठोंबरे, अभिनव गोंधळी यांच्यासह सदस्यांनी ग्रामीण भागातील स्वरूप प्रवीण शेटे ह्या मुलाची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल भव्य स्वरूपाचे पुष्पहार अर्पण करून आशीर्वाद दिला.
यावेळी प्रवीण शेटे, सुजाता शेटे, हर्षवर्धन शेटे, वर्ध कुलकर्णी, यशवंत पाटील अण्णासाहेब शेंडुरे,एस. वाय. वाईंगडे, अभिनव गोंधळी, शिवराज नाईक, सतिश भोजे, हेमलता काटकर, हणमंत आपटे, पांडुरंग मुळीक, सुनिल विद्याधर गाट ,स्मिता विरकुमार शेंडुरे , अमोल गाट, अभिनंदन गाट, सुनिल गाट,दिव्यानी माळी, दिलीप पाटील, विरकुमार शेंडुरे प्रदीप ठोंबरे, निखिल जैन यांच्यासह पास्ट रोटरॅकट क्लब ऑफ हुपरीचे सर्व सदस्य, नागरिक, महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.आभार व सूत्रसंचालन अमोल गाट यांनी केले.
 

Go to Source