स्वामी विवेकानंद, आनंद क्रिकेट अकॅडमी संघ विजयी
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 16 वर्षाखालील मुलींच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून स्वामी विवेकानंद संघाने एम्स क्रिकेट अकॅडमी संघाचा 8 गड्यांनी तर आनंद अकादमीने हुबळी महिला क्रिकेट अकॅडमीचा 9 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मानसी मोरे, अनुश्री यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळवण्यात आलेल्या मुलींच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत पहिल्या उपांत्य सामन्यात हुबळी महिला क्रिकेट अकॅडमीने प्रथम फलंदाजी करताना 25 षटकात 6 गडी बाद 123 धावा केल्या. त्यात लक्ष्मी लोखंडेने 9 चौकारांसह 50, वैष्णवी बी. एच. ने 2 चौकारांसह 20 धावा केल्या. आनंद तर्फे स्वाती भटने 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमीने 11.2 षटकात एक गडी बाद 124 धावा करुन सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात मानसी मोरेने 15 चौकारांसह 63, प्रणाली आनंदने 4 चौकारांसह 25 धावा केल्या. हुबळी तर्फे प्रिया चव्हाणने एक गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात एम्स संघाने प्रथम फलंदाजी 19.1 षटकात 9 गडी बाद 83 धावा केल्या. त्यात मेहक फैयाजने 2 चौकारांसह 16, तर झोया अल्लुरने 12 धावा केल्या. स्वामी विवेकानंद तर्फे मिसबा सय्यद व अनुश्री यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना स्वामी विवेकानंदने 12.4 षटकात 2 बाद 84 धावा करून सामना 8 गड्यांनी जिंकला. अनुश्रीने 7 चौकारांसह 37, मेघा पाटीलने 13 धावा केल्या. एम्सतर्फे आर्या परब व मरीअम्मा फैयाज यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
Home महत्वाची बातमी स्वामी विवेकानंद, आनंद क्रिकेट अकॅडमी संघ विजयी
स्वामी विवेकानंद, आनंद क्रिकेट अकॅडमी संघ विजयी
बेळगाव : आनंद क्रिकेट अकादमी आयोजित 16 वर्षाखालील मुलींच्या आंतर क्लब क्रिकेट स्पर्धेत आज खेळविण्यात आलेल्या सामन्यातून स्वामी विवेकानंद संघाने एम्स क्रिकेट अकॅडमी संघाचा 8 गड्यांनी तर आनंद अकादमीने हुबळी महिला क्रिकेट अकॅडमीचा 9 गड्यांनी पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मानसी मोरे, अनुश्री यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. भगवान महावीर मैदानावर खेळवण्यात आलेल्या […]