दोडामार्गात २० रोजी स्वामी समर्थांच्या पादुका पालखीचे आगमन
दोडामार्ग – वार्ताहर
दोडामार्ग येथे पिंपळेश्वर देवस्थान येथील हॉलमध्ये स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पालखीचे आगमन होणार आहे. ही परंपरा गेल्या तेरा वर्षापासून स्वामी समर्थ भक्त मंडळ दोडामार्ग हे जपत आहेत. यावर्षी देखील शनिवार दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दोडामार्ग येथे स्वामी समर्थ महाराजाच्या पादुका पालखीचे आगमन होत आहे.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट येथून स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पालखीचे आगमन होणार आहे. दोडामार्ग राष्ट्रोळी मंदिर येथून दिंडी काढत स्वामी समर्थ महाराज यांच्या नामस्मरण करत मिरवणूक काढत पादुका पालखीचे दोडामार्ग पिंपळेश्वर देवस्थान हॉल येथे सायंकाळी ६ वाजता आगमन होऊन या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम सुरू होणार आहेत. सातेरी भुमिका दिंडीपथक खैटवाडा कासारपाल गोवा हेही सहभागी होणार आहेत. या रात्री महाप्रसाद तसेच राष्ट्रीय नाट्य पुरस्कार विजेते ह. भ. प. प्रशांत धोंड यांचे गुरू महिमा या विषयावर किर्तन सादर होणार आहे. तरी सर्व भाविकांनी दर्शनाचा व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दोडामार्ग तालुका स्वामी समर्थ भक्त मंडळ यांनी केले आहे.
Home महत्वाची बातमी दोडामार्गात २० रोजी स्वामी समर्थांच्या पादुका पालखीचे आगमन
दोडामार्गात २० रोजी स्वामी समर्थांच्या पादुका पालखीचे आगमन
दोडामार्ग – वार्ताहर दोडामार्ग येथे पिंपळेश्वर देवस्थान येथील हॉलमध्ये स्वामी समर्थ महाराज यांच्या पादुका पालखीचे आगमन होणार आहे. ही परंपरा गेल्या तेरा वर्षापासून स्वामी समर्थ भक्त मंडळ दोडामार्ग हे जपत आहेत. यावर्षी देखील शनिवार दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता दोडामार्ग येथे स्वामी समर्थ महाराजाच्या पादुका पालखीचे आगमन होत आहे.श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ […]
