राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत डीवायईएस संघाचे सुयश
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएसचा बॉक्सिंग संघाने विविध गटात मुला-मुलींनी 7 सुवर्ण, 7 रौप्य, 2 कास्य पदकासह 16 पदकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले आहे. जयप्रकाश नारायण राष्ट्रीय युथ सेंटरच्या बॉक्सिंग सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस संघाने भाग घेतला होता. त्यामध्ये सबज्युनियर मुलांच्या गटात गुरूराज जुवेकरने 40 ते 43 वजनी गटात कास्यपदक, पार्थ चतुर्थने 43 ते 46 किलो गटात कास्यपदक, सुधीप मासुतीने 52 ते 55 किलो गटात रौप्य, विवेक कुनाकीकोप्पने 58 ते 61 किलो गटात रौप्य पदक पटकाविले. मुलींच्या विभागात प्रतिक्षा कांबळेने 36 ते 38 किलो वजनी गटात सुवर्ण पदक, श्रावणी पाटीलने 49 ते 52 किलो गटात सुवर्णपदक, स्फुर्ती वालीने 34 ते 36 किलो. गटात रौप्य, रिया शेट्टरने 38 ते 40 गटात रौप्य, याशिका हिरेमठने 48 ते 50 गटात रौप्य पदक पटकाविले. ज्युनियर गटात मुलांमध्ये कौस्तुब मिरजकरने 40 ते 46 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकाविले. मुलींच्या विभागात ज्ञानेश्वरी धुडूमने 54 ते 57 गटात सुवर्ण पदकासह उत्कृष्ट बॉक्सिंगपटूचा पुरस्कार मिळविला. रितु मिश्राने 50 ते 52 किलो. गटात सुवर्ण पदक पटकाविले. युथ मुलांच्या 54 ते 57 किलो. गटात अन्शुल वस्त्रदने रौप्यपदक, ईलाईट पुरूषांच्या गटात मल्लाप्पा करगुप्पीने, 46 ते 58 गटात सुवर्ण, विशाल न्ंिांबाळकरने 48 ते 51 किलो गट सुवर्ण, महेश मासुतीने 60 ते 63.5 गटात सुवर्ण पदक पटकाविले. या सर्व बॉक्सींगपटूंना अर्जुन पुरस्कार विजेते मुकुंद किल्लेकर यांचे मार्गदर्शन लाभले.
Home महत्वाची बातमी राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत डीवायईएस संघाचे सुयश
राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेत डीवायईएस संघाचे सुयश
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य बॉक्सिंग संघटना आयोजित राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएसचा बॉक्सिंग संघाने विविध गटात मुला-मुलींनी 7 सुवर्ण, 7 रौप्य, 2 कास्य पदकासह 16 पदकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले आहे. जयप्रकाश नारायण राष्ट्रीय युथ सेंटरच्या बॉक्सिंग सभागृहात घेण्यात आलेल्या या स्पर्धेत बेळगावच्या डीवायईएस संघाने भाग घेतला होता. त्यामध्ये सबज्युनियर मुलांच्या […]
