‘बार’च्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे
सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचे दिले आश्वासन
बेळगाव : बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. यावेळी बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी, सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर न्यायालयाच्या आवारात असलेल्या विविध समस्या दूर करणार असून वकिलांना भेडसावणाऱ्या समस्याही दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. मावळत्या पदाधिकाऱ्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी मावळते जनरल सेक्रेटरी अॅड. गिरीराज पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले. त्यानंतर सर्वांना पुष्पगुच्छ देण्यात आले. यावेळी जनरल सेक्रेटरी अॅड. वाय. के. दिवटे म्हणाले, आपल्यावर जी जबाबदारी सोपविली आहे ती प्रामाणिकपणे आम्ही पार पाडू, असे सांगितले. यावेळी उपाध्यक्ष अॅड. बसवराज मुगळी, उपाध्यक्ष अॅड. विजय पाटील, उपाध्यक्ष अॅड. शीतल रामशेट्टी, जॉईंट सेक्रेटरी अॅड. विश्वनाथ बसवराज सुलतानपुरी यांच्यासह कमिटी सदस्य व महिला प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी ‘बार’च्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे
‘बार’च्या नूतन पदाधिकाऱ्यांनी स्वीकारली सूत्रे
सर्वांना विश्वासात घेऊन काम करण्याचे दिले आश्वासन बेळगाव : बार असोसिएशनच्या नूतन पदाधिकाऱ्यांनी सोमवारी सूत्रे स्वीकारली. यावेळी बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अॅड. एस. एस. किवडसण्णावर यांनी, सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले. याचबरोबर न्यायालयाच्या आवारात असलेल्या विविध समस्या दूर करणार असून वकिलांना भेडसावणाऱ्या समस्याही दूर करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करेन, असे आश्वासन त्यांनी दिले. […]
