शिवसेना युबीटी नेत्याच्या मुलाचा रिक्षा चालकाशी वादानंतर संशयास्पद मृत्यू

शिवसेना युबीटीचे नेते माजी ठाणे जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचा मुलाचा रिक्षा चालकाशी वाद झाल्यानंतर संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. मिलिंद मोरे असे मयत चे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिलिंद मोरे रविवारी सायंकाळी वसईतील नवाबपूर भागातील एका रिसॉर्ट मध्ये कुटुंबियांसमवेत पोहोचल्यावर त्यांचा रिक्षाचालकाशी काही कारणावरून वाद झाला. वाद सुरु असतांना लोकांनी त्यांना मारहाण केल्यावर मिलिंद खाली कोसळले.ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. 

त्यांना तातडीने कुटुंबीयांनी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मिलिंद मोरे यांचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाच्या शवविच्छेदनाननंतर अधिक स्थिती स्पष्ट होईल. मिलिंद मोरे हे स्वतः शिवसेनेच्या युबीटीचे नेते असून ठाण्याचे उपजिल्हाप्रमुख होते. 

कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाचा विरोधात सदोष मनुष्यवधाचा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी रिक्षाचालक पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. 

या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेत पोलीस उपायुक्तांशी फोन वरून चर्चा करून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.   

Edited By- Priya Dixit 

Go to Source