बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने (नाडा) रविवारी भारतीय मल्ल बजरंग पुनियावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई केली आहे. नाडाने यासंदर्भात बजरंग पुनियाला अधिकृत नोटीस बजावली नसल्याच्या आरोपावरुन एडीडीपीकडून पुनियावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उठवण्यात आली होती. या घटनेला तीन आठवड्यांच कालावधी झाला होता. 23 एप्रिल रोजी नाडाकडून बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. बजरंग […]

बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संघटनेने (नाडा) रविवारी भारतीय मल्ल बजरंग पुनियावर दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई केली आहे. नाडाने यासंदर्भात बजरंग पुनियाला अधिकृत नोटीस बजावली नसल्याच्या आरोपावरुन एडीडीपीकडून पुनियावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई उठवण्यात आली होती. या घटनेला तीन आठवड्यांच कालावधी झाला होता.
23 एप्रिल रोजी नाडाकडून बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. बजरंग पुनियाने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक मिळविले होते. सोनेपथ येथे 10 मार्च रोजी घेण्यात आलेल्या निवड चाचणी वेळी बजरंग पुनियाकडे मूत्रल चाचणी नमुन्याची मागणी करण्यात आली होती. पण पुनियाने त्याला स्पष्ट नकार दिला होता. यानंतर विश्व नियंत्रण समितीने बजरंगवर निलंबनाची कारवाई केली होती. या निर्णयाविरुद्ध बजरंगने नाडाच्या शिस्तपालन समितीकडे दाद मागितली होती. त्यानंतर 31 मे रोजी नाडाच्या शिस्तपालन समितीने बजरंग पुनियावरील निलंबनाची कारवाई उठवली होती. दरम्यान नाडाकडून बजरंग पुनियाला या संदर्भात कायदेशीर नोटीस बजावण्यात आली. रविवारी नाडाकडून ही नोटीस बजरंग पुनियाला मिळाली.