मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस फोडलं
पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया (Sushil Kedia On Raj Thackeray) यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं होतं. त्यानंतर अनेक मराठीप्रेमींनी राग व्यक्त केला होता.मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टॅग करत म्हटलं होतं. सुशील केडियाच्या या विधानानंतर आज सुशील केडिया यांचं मुंबईतील ऑफिस फोडल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईत विजयी मेळावा सुरु होण्याआधी ही घटना घडली आहे. सुशील केडिया यांचं ऑफिस तोडण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मराठी लोकांनी केडियांचा माज उतरवला अशा पोस्ट व्हायरल होत आहे. सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. सेबी (SEBI) नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार अशी त्यांची फर्म आहे. शेअर बाजारातील अनुभवामुळे ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक म्हणून भूमिका बजावतात, बाजू मांडतात. केडिया यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये काम केले आहे. सुशील केडिया यांच्याकडे असलेल्या 45 कंपन्यांमधील शेअर्सचे जून 2025 पर्यंतचे एकूण मूल्य 3,103 कोटींहून अधिक आहे.
Home महत्वाची बातमी मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस फोडलं
मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडियाचं ऑफिस फोडलं
पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या वादाने आता मराठी विरुद्ध अमराठी असं रूप घेतलं आहे. त्यातच मराठीत न बोलल्याने मीरारोड येथे एका दुकानदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती.
त्या पार्श्वभूमीवर आता एक प्रसिद्ध व्यावसायिक आणि केडियोनॉमिक्सचे संस्थापक सुशील केडिया (Sushil Kedia On Raj Thackeray) यांनी मराठीप्रेमींना डिवचणारं विधान केलं होतं. त्यानंतर अनेक मराठीप्रेमींनी राग व्यक्त केला होता.
मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा, असे केडिया यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना टॅग करत म्हटलं होतं.
सुशील केडियाच्या या विधानानंतर आज सुशील केडिया यांचं मुंबईतील ऑफिस फोडल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा मुंबईत विजयी मेळावा सुरु होण्याआधी ही घटना घडली आहे.
सुशील केडिया यांचं ऑफिस तोडण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर मराठी लोकांनी केडियांचा माज उतरवला अशा पोस्ट व्हायरल होत आहे.
सुशील केडिया हे नाव शेअर मार्केटशी निगडीत असून ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत. शेअर मार्केटमधील ‘केडियोनॉमिक्स’ कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. सेबी (SEBI) नोंदणीकृत ट्रेडिंग आणि सल्लागार अशी त्यांची फर्म आहे.
शेअर बाजारातील अनुभवामुळे ते अनेकदा विविध आर्थिक वृत्तवाहिन्यांवर विश्लेषक म्हणून भूमिका बजावतात, बाजू मांडतात. केडिया यांनी 25 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणूक बँका तसेच दोन मोठ्या हेज फंडांमध्ये काम केले आहे.
सुशील केडिया यांच्याकडे असलेल्या 45 कंपन्यांमधील शेअर्सचे जून 2025 पर्यंतचे एकूण मूल्य 3,103 कोटींहून अधिक आहे.