अफगाण मालिकेतून सूर्या बाहेर

वृत्तसंस्था/ सेंच्युरियन भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव उपलब्ध होऊ शकणार नाही. दक्षिण आफ्रिका बरोबर नुकत्याच झालेल्या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याचप्रमाणे अष्टपैलू हार्दिक पांड्या या मालिकेसाठी उपलब्ध होण्यासंदर्भात साशंकता व्यक्त केली जात आहे. जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 31 […]

अफगाण मालिकेतून सूर्या बाहेर

वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव उपलब्ध होऊ शकणार नाही. दक्षिण आफ्रिका बरोबर नुकत्याच झालेल्या मालिकेत सूर्यकुमार यादवच्या घोट्याला दुखापत झाली होती. त्याचप्रमाणे अष्टपैलू हार्दिक पांड्या या मालिकेसाठी उपलब्ध होण्यासंदर्भात साशंकता व्यक्त केली जात आहे.
जोहान्सबर्गमध्ये झालेल्या दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना 31 वर्षीय सूर्यकुमारचा घोटा मुरगळला होता. अद्याप त्याला या दुखापतीच्या वेदना होत असल्याने तो अफगाण विरुद्धच्या मालिकेत खेळू शकणार नाही असे बीसीसीआयच्या प्रवक्त्याने सांगितले. ही दुखापत भरून येण्यासाठी त्याला किमान 6 आठवडे विश्रांती घ्यावी लागेल असे संघाच्या वैद्यकीय पथकाकडून सांगण्यात आले. अफगाणबरोबरची मालिका सुरू होण्यास जवळपास तीन आठवड्यांचा कालावधी बाकी आहे. सूर्यकुमार आता येत्या फेब्रुवारी महिन्यात रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाकडून खेळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 2024 च्या आयपीएल स्पर्धेपूर्वी त्याला आपली तंदुरुस्ती चाचणी द्यावी लागेल
भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पांड्यालाही यापूर्वी घोटा दुखापत झाली होती. या दुखापतीतून अद्याप तो पूर्णपणे बरा झालेला नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हार्दिकच्या तंदुरुस्ती समस्येबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. आयपीएल स्पर्धेत सूर्यकुमार यादव किंवा हार्दिक पांड्या उपलब्ध होऊ शकले नाहीत तर मात्र मुंबई इंडियन्सच्या फ्रांचायझीकडून कदाचित रोहित शर्माला नेतृत्वची जबाबदारी दिली जाईल असे वाटते. अफगाणविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी अष्टपैलू रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद सोपविण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे पण इंग्लंडचा संघ भारतात पाच कसोटी सामने खेळण्यासाठी येणार असल्याने जडेजावर अति ताण पडण्याची शक्यता आहे. या कसोटी मालिकेत रविंद्र जडेजा निश्चितपणे खेळणार असल्याचे सांगितले. सध्या भारतीय व्यवस्थापनासमोर विविध खेळाडूंच्या दूखापतीची समस्या निर्माण झाली आहे. आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडच्या बोटाचे हाड मोडल्याने तो पुन्हा जायबंदी झाला आहे.
दक्षिण आफ्रिकेबरोबर होणाऱ्या आगामी कसोटी मालिकेसाठी यष्टीरक्षक आणि फलंदाज इशान किसन आपल्या काही वैयक्तिक समस्येमुळे उपलब्ध होऊ शकलेला नाही. गेल्या वर्षभरापासून त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याने तो अफगाणविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची शक्यता दुरावली आहे. त्यामुळे आता या मालिकेत जीतेश शर्माकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी सोपविली जाईल असे वाटते.