आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुरेश देवरमनींना तीन सुवर्ण

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुरेश देवरमनींना तीन सुवर्ण

बेळगाव : उत्तर प्रदेश येथे भारतीय मास्टर्स अॅथॅलॅटिक्स संघटना व मास्टर अॅथॅलॅटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय मास्टर अॅथॅलॅटिक्स स्पर्धेत बेळगावच्या सुरेश देवरमनी यांनी 72 वर्षावरील गटात 1500 मी. धावणे, 5000 मी. व 5000 मी. वॉक (चालणे) स्पर्धेत सलग तीन सुवर्ण पदके पटकविली व श्रीलंका आणि बांगलादेश या देशातील स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. उत्तर प्रदेश डॉ.आंबेडकर आंतरराष्ट्रीय अॅथॅलॅटिक्स मैदानावरती घेण्यात आलेल्या राष्ट्रीय मास्टर अॅथॅलॅटिक्स स्पर्धेत बेळगावचे ज्येष्ठ धावपटू यांनी 72 वर्षीय गटात 1500 मी. धावण्याच्या  स्पर्धेत 7:37:04 इतक्या वेळेत पूर्ण करीत सुवर्ण पदक पटकाविले. 5000 मी. धावण्याच्या स्पर्धेत 29:50:05 सेकंद इतक्या वेळेत पूर्ण करीत सुवर्ण पदक तर 5000 मी. वॉकिंग (जलद चालणे) स्पर्धेत 37:20:02 वेळेत पूर्ण करुन सुवर्ण पदके पटकविली. या स्पर्धेत तीन सुवर्ण पदके पटकावित बेळगावचे नाव उज्वल केले आहे. सुरेश देवरमनी यांना मान्यवरांच्या  हस्ते सुवर्ण पदके, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.