इंदूरमध्ये सुरतची पुनरावृत्ती होणार ?

मध्यप्रदेशातील लोकसभा मतदारसंघ इंदूर येथे गुजरातमधील सुरत या मतदारसंघाचीच पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चिला जात आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निर्विरोध निवडणूक आला आहे. आता इंदूर येथेही हेच होऊ घातल्याचे दिसून येत आहे. येथील काँग्रेस उमेदवाराने मतदानापूर्वीच माघार घेतली आहे. काँग्रेसचे नेते आणि इंदूर मतदारसंघातील उमेदवार अक्षय कांती […]

इंदूरमध्ये सुरतची पुनरावृत्ती होणार ?

मध्यप्रदेशातील लोकसभा मतदारसंघ इंदूर येथे गुजरातमधील सुरत या मतदारसंघाचीच पुनरावृत्ती होणार का, हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरदारपणे चर्चिला जात आहे. सुरत लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निर्विरोध निवडणूक आला आहे. आता इंदूर येथेही हेच होऊ घातल्याचे दिसून येत आहे. येथील काँग्रेस उमेदवाराने मतदानापूर्वीच माघार घेतली आहे.
काँग्रेसचे नेते आणि इंदूर मतदारसंघातील उमेदवार अक्षय कांती बाम यांनी सोमवारी सकाळी आपले काँग्रेस पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेले उमेदवारी आवेदन पत्र मागे घेतले. नंतर त्यांनी पत्रकारांना माहिती दिली. इंदूर मतदारसंघात मतदानाच्या चौथ्या टप्प्यात 13 मे या दिवशी मतदान होणार आहे. येथे भारतीयै जनता पक्षाने विद्यमान खासदार शंकर ललवाणी यांनाच उमेदवारी दिली आहे.
भाजपमध्ये प्रवेश शक्य
अक्षय कांती बाम हे केवळ उमेदवारी मागे घेऊन थांबलेले नाहीत, तर त्यांनी भारतीय जनता पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त आहे. मध्यप्रदेशातील भारतीय जनता पक्षाचे नेते कैलाश विजयवर्गिय यांनी त्यांचे आमच्या पक्षात स्वागत आहे, असेही विधान केलेले आहे. तसेच बाम आणि विजयवर्गिय यांनी सोमवारीच काहीकाळ एकाच वाहनातून प्रवास केल्याचेही वृत्त देण्यात आले आहे.
इंदूर, सुरत :  अंतर काय…
अर्थात सुरतमधील घडामोड आणि इंदूरमधील घटना यांच्यात महत्वाचे अंतर आहे. सुरतमध्ये काँग्रेसचे मुख्य उमेदवार निलेश कुंभाणी यांचा निवडणूक अर्ज अमान्य करण्यात आला होता. तसेच पर्यायी उमेदवाराचा अर्जही नाकारण्यात आला होता. शिवाय त्या मतदारसंघातील सर्व इतर उमेदवारांनीही अर्ज मागे घेतल्याने कुंभाणी निर्विरोध विजयी झाले होते. इंदूर येथे केवळ काँग्रेसचे मुख्य उमेदवार बाम यांनी माघार घेतली आहे. पर्यायी उमेदवाराने काय केले आहे, याची माहिती देण्यात आलेली नाही. तसेच इतर आणि अपक्ष उमेदवार मैदानात असतील तर मतदान घ्यावेच लागणार आहे. पण मुख्य प्रतिस्पर्ध्याच्या माघारीमुळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ललवाणी यांना निवडणूक सोपी जाणार हे निश्चित आहे. आता काँग्रेस पुढची हालचाल कोणती करणार याकडे राजकीय जाणकारांचे लक्ष लागले आहे.