मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा द्या!

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन : कौजलगी येथे प्रचारसभा बेळगाव : 25 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवन सुरू केले होते. आज मी 7 कोटी लोकसंख्या असणाऱ्या कर्नाटकातील एकमेव महिला मंत्री आहे. यावरून सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षात दिलेले महत्त्व अधोरेखीत होते, असे सांगून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे स्थानिक उमेदवार […]

मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा द्या!

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन : कौजलगी येथे प्रचारसभा
बेळगाव : 25 वर्षांपूर्वी काँग्रेस पक्षात सामान्य कार्यकर्ता म्हणून राजकीय जीवन सुरू केले होते. आज मी 7 कोटी लोकसंख्या असणाऱ्या कर्नाटकातील एकमेव महिला मंत्री आहे. यावरून सामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षात दिलेले महत्त्व अधोरेखीत होते, असे सांगून मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे स्थानिक उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना पाठिंबा द्या, असे आवाहन केले. शुक्रवारी अरभावी विधानसभा मतदारसंघातील मेळवंकी आणि कौजलगी भागातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सभेत बोलताना त्यांनी लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घ्यावेत, असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. पुढे त्या म्हणाल्या, मागील 20 वर्षांपासून बेळगावमध्ये भाजपचा खासदार असून देखील कामगिरी शून्य आहे. स्थानिक समस्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता स्थानिक समस्यांची योग्य जाणीव असणारे मृणाल हेब्बाळकर यांना तुमच्यावतीने दिल्लीत काम करण्याची संधी द्यावी. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बेळगावमधून मृणाल हेब्बाळकर आणि चिकोडी मतदारसंघातून प्रियांका जारकीहोळी यांना निवडणुकीसाठी उभे केले आहे. काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवारांना विजयी करा, असे आवाहनही मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.