फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून हालसिद्ध देवस्थानला पशूखाद्याचा पुरवठा
‘प्राणीमात्रांवर दया करा’ची अंमलबजवणी
बेळगाव : प्राणीमात्रांवर दया करा, हा संदेश फेसबुक फ्रेंड्स सर्कल प्रत्यक्षात अंमलात आणत आहे. गेल्या महिन्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला. पाण्याची टंचाई निर्माण झाली. जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले. याची नोंद घेऊन फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी गो-शाळांना चारा पुरवठा केला. श्री हालसिद्धनाथ देव ट्रस्ट, कुर्ली-आप्पाचीवाडीतील हालसिद्ध देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष रणजितसिंग पाटील यांनी फेसबुक फ्रेंड्स सर्कलला आपल्या देवस्थानातील घोडे आणि गायींसाठी पशुखाद्य देण्याची व्यवस्था होईल का? अशी विचारणा करणारे पत्र पाठविले. फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे प्रमुख संतोष दरेकर आणि सर्व सदस्यांनी तेरा पोती पशुखाद्य (प्रत्येकी 50 किलो), 30 किलो हरभरा डाळ, 20 किलो गूळ हालसिद्ध देवस्थानला जाऊन पोहोचविले. या उपक्रमामध्ये श्रीनिवास दत्तुलकर, विशाल पाटील, नितीन, विनायक, कला मुजुमदार, रोहन कुलकर्णी, प्रणाली परब, राधा अणवेकर, मृणाल बापट, श्रीनाथ, सुनील, शैलेश, जमयांग, डॉ. समीर, डॉ. आनंद, रेखा नायडू, सुदीप, दिलावर यांचा सहभाग होता. याप्रसंगी हालसिद्ध देवस्थान समितीचे रणजितसिंग पाटील, विश्वस्त विजय व विनायक शिंत्रे, तानाजी चौगुले, कृष्णनाथ चव्हाण, शंकर वासकर, मुरारी पुजारी, सुरेश पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून हालसिद्ध देवस्थानला पशूखाद्याचा पुरवठा
फेसबुक फ्रेंड्स सर्कलकडून हालसिद्ध देवस्थानला पशूखाद्याचा पुरवठा
‘प्राणीमात्रांवर दया करा’ची अंमलबजवणी बेळगाव : प्राणीमात्रांवर दया करा, हा संदेश फेसबुक फ्रेंड्स सर्कल प्रत्यक्षात अंमलात आणत आहे. गेल्या महिन्यात उष्णतेच्या लाटेने कहर केला. पाण्याची टंचाई निर्माण झाली. जनावरांना चारा मिळणे दुरापास्त झाले. याची नोंद घेऊन फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सदस्यांनी गो-शाळांना चारा पुरवठा केला. श्री हालसिद्धनाथ देव ट्रस्ट, कुर्ली-आप्पाचीवाडीतील हालसिद्ध देवस्थान पंच समितीचे अध्यक्ष रणजितसिंग […]