सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत वीजपुरवठा करा

निडगल ग्रामस्थांची मागणी, वीट उत्पादकांचा तोटा खानापूर : तालुक्यात सध्या वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्यात येते. मात्र रात्री वीजपुरवठा करण्यात येत नसल्याने वीट उत्पादनाच्या कामात मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. त्यामुळे वीट उत्पादनाचे काम मंदावले आहे. यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सिंगलफेज वीजपुरवठा करण्यात यावा, अन्यथा जानेवारीच्या पहिल्या […]

सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत वीजपुरवठा करा

निडगल ग्रामस्थांची मागणी, वीट उत्पादकांचा तोटा
खानापूर : तालुक्यात सध्या वीट उत्पादन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासाठी तात्पुरती वीजजोडणी घेण्यात येते. मात्र रात्री वीजपुरवठा करण्यात येत नसल्याने वीट उत्पादनाच्या कामात मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. त्यामुळे वीट उत्पादनाचे काम मंदावले आहे. यासाठी सायंकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सिंगलफेज वीजपुरवठा करण्यात यावा, अन्यथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उग्र आंदोलन करणार असल्याचे निवेदन निडगल, भंडरगाळी, बरगाव, तोपिनकट्टी, सन्नहोसूर या परिसरातील ग्रामस्थांनी हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर तसेच तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना दिले आहे. वीट उत्पादनासाठी वीट उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात पैसे भरुन तात्पुरता वीजपुरवठा घेतला आहे. मात्र सायंकाळी 6 ते 12 या वेळेत सिंगलफेज वीजपुरवठाच करण्यात येत नसल्याने या वीट उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. वीट उत्पादन हे सायंकाळी 6 ते 12 या वेळेत करण्यात येते. यासाठी रात्री विजेची गरज असते.
मात्र वीजपुरवठाच करण्यात येत नसल्याने मोठी पंचायत निर्माण झाली आहे. यापूर्वी हे लोक मोठे रॉकेलचे दिवे वापरुन वीट उत्पादन करत होते. मात्र अलीकडे रॉकेलच मिळणे बंद झाल्याने वीट उत्पादकांनी चार महिन्यासाठी तात्पुरते वीजकनेक्शन घेण्यात येते. मात्र वीजपुरवठाच होत नसल्याने वीट उत्पादनाच ठप्प झाले आहे. त्यामुळे वीट उत्पादकांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. जिल्ह्यातील हुक्केरी, हल्याळ, कित्तूर, चिकोडी, सौंदत्ती, बैलहोंगल तालुक्यात रात्री वीजपुरवठा करण्यात येतो. वीट उत्पादनाचा काळ फक्त चार महिने असतो. यासाठी हेस्कॉमकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यात यावा, अन्यथा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उग्र आंदोलन करण्याचा इशारा निडगल परिसरातील ग्रामस्थांनी दिला आहे. यावेळी गणपत पाटील, निवृत्ती पाटील, नारायण कडोलकर, कल्लाप्पा पाटील, यशवंत कदम, रावसाब पाटील इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
हेस्कॉम अभियंत्या कल्पना तिरवीर
यावेळी हेस्कॉमच्या अभियंत्या कल्पना तिरवीर म्हणाल्या, सायंकाळी 6 ते 12 या वेळेत सिंगलफेज वीजपुरवठा देण्यात येतो. मात्र शेतकरी पाण्यासाठी याचा वापर करत असल्याने हा वीजपुरवठा बंद होतो. पाण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसभरात सिंगलफेज आणि थ्रीफेज वीजपुरवठा होतो. असे असताना रात्री पुन्हा शेतकरी सिंगलफेज वीजपुरवठ्याचा कनर्व्हटर वापरुन पाण्यासाठी वापर करतात. त्यामुळे हा वीजपुरवठा आपोआप बंद होतो. यासाठी शेतकऱ्यांनी रात्री करण्यात येणारा सिंगलफेज वीजपुरवठ्यावर पाण्याच्या मोटारी सुरू करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले.