रोटरी अन्नोत्सवामध्ये आज सुपर वुमन स्पर्धा रंगणार!
सौंदर्यच नव्हे तर गुणवत्तेलाही मिळणार प्राधान्य : अन्नोत्सवाची उद्या सांगता
बेळगाव : देशभरातील खाद्यपदार्थांची चव चाखता येत असल्याने अन्नोत्सवाला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. चटपटीत, चमचमीत, लज्जतदार खाद्यपदार्थांची पर्वणी असल्याने रोटरी अन्नोत्सवाला शनिवारीही तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रोटरी अन्नोत्सवामध्ये आज सुपर वूमन स्पर्धा रंगणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी रोटरी अन्नोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. 6 पासून सुरू झालेल्या अन्नोत्सवाची रविवार दि. 14 रोजी सांगता होणार आहे. खाद्यपदार्थांसोबतच महिलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सुपर वुमन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज कुटुंबासाठी काम करणाऱ्या महिलांना एक वेगळा आनंद मिळावा, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी नुकतीच कॅम्प येथील मेसॉनिक हॉल येथे पार पडली. यामध्ये 24 स्पर्धक सहभागी झाले होते.
टॅलेंट, फिटनेस व कुकिंग अशा पहिल्या तीन फेरी पार पडल्या. यानंतर आता शनिवार दि. 13 रोजी रॅम्पवॉक, प्रश्नावलींसह ग्रॅण्ड फिनाले अन्नोत्सवाच्या मुख्य व्यासपीठावर होणार आहे. कार्यक्रमाला गतवर्षीची सुपर वुमन अमृता रायबागी या नव्या सुपर वुमनला क्राऊन देणार आहेत. कार्यक्रमाला फेमिना मिस इंडिया कर्नाटका-2020 च्या पहिल्या पाच विजेत्या स्पर्धकांमधील रती हुलजी उपस्थित रहाणार आहे. तसेच त्या सर्व महिलांना आपल्या प्रवासाची माहिती देणार आहेत. रोटरी क्लब ऑफ बेळगावने सुपर वुमन स्पर्धेसाठी बेळगावमधील महिलांना खुले निमंत्रण दिले होते. स्पर्धेसाठी अनेक निकष ठरविण्यात आले असून त्या निकषांच्या आधारे सुपर वुमन ठरविली जाणार आहे. बेळगावमधील विवाहीत 35 वर्षांवरील महिलांना स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतले जाणार आहे. महिलांमधील आत्मविश्वास वाढावा तसेच त्यांना व्यासपीठावर वावरण्याची संधी मिळावी यासाठी रोटरीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.
Home महत्वाची बातमी रोटरी अन्नोत्सवामध्ये आज सुपर वुमन स्पर्धा रंगणार!
रोटरी अन्नोत्सवामध्ये आज सुपर वुमन स्पर्धा रंगणार!
सौंदर्यच नव्हे तर गुणवत्तेलाही मिळणार प्राधान्य : अन्नोत्सवाची उद्या सांगता बेळगाव : देशभरातील खाद्यपदार्थांची चव चाखता येत असल्याने अन्नोत्सवाला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. चटपटीत, चमचमीत, लज्जतदार खाद्यपदार्थांची पर्वणी असल्याने रोटरी अन्नोत्सवाला शनिवारीही तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर रोटरी अन्नोत्सवामध्ये आज सुपर वूमन स्पर्धा रंगणार असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रोटरी क्लब ऑफ […]