सुनीता विल्यम्सची आज तिसरी अंतराळझेप

बोईंगच्या पॅप्सूलमधून अवकाश प्रवास करणार वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स 7 मे रोजी तिसऱ्या अंतराळ प्रवासाला निघणार आहेत. बोईंगच्या स्टारलायनर पॅलिप्सो मोहीमेद्वारे सुनीता विल्यम्स आणखी एकदा अंतराळ झेप घेणार असल्याची माहिती अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दिली. या मोहिमेसाठी बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली असून दोघेही […]

सुनीता विल्यम्सची आज तिसरी अंतराळझेप

बोईंगच्या पॅप्सूलमधून अवकाश प्रवास करणार
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स 7 मे रोजी तिसऱ्या अंतराळ प्रवासाला निघणार आहेत. बोईंगच्या स्टारलायनर पॅलिप्सो मोहीमेद्वारे सुनीता विल्यम्स आणखी एकदा अंतराळ झेप घेणार असल्याची माहिती अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने दिली. या मोहिमेसाठी बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या दोन ज्येष्ठ शास्त्रज्ञांची निवड करण्यात आली असून दोघेही आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात सुमारे एक आठवडा घालवतील. बोईंगचे स्टारलायनर अंतराळयान भारतीय वेळेनुसार मंगळवारी सकाळी 8:04 वाजता केनेडी स्पेस सेंटर येथून अलायन्स अॅटलस व्ही रॉकेटवरून प्रक्षेपित केले जाईल.
बोईंग स्टारलायनरच्या माध्यमातून प्रथमच अंतराळवीरांना अंतराळात नेले जात आहे. स्टारलायनर मिशनसाठी एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येईल असा अंदाज आहे. ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळ क्षेत्रातील हे मोठे पाऊल मानले जाईल. बोईंग स्टारलायनरची ही मोहीम यशस्वी झाल्यानंतर अंतराळ पर्यटनासाठी नवीन दरवाजे उघडतील. या मोहीमेसाठी नासाची मदत घेण्यात आली असून त्यासाठीची तयारी पूर्ण झाली आहे. यापूर्वी हे अंतराळ यान जुलै 2022 मध्ये निघणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते एक वर्षासाठी पुढे ढकलण्यात आले होते. सुनीता विल्यम्स सध्या बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टवर क्रू फ्लाईट टेस्ट मिशन पायलट म्हणून प्रशिक्षण घेत आहे.
सुनीता विल्यम्सचा अवकाश प्रवास
सुनीता विल्यम्स याआधी दोनदा अंतराळ प्रवासाला गेल्या आहेत. जून 1998 मध्ये सुनीता विल्यम्सची अमेरिकेची अंतराळ संस्था नासामध्ये निवड झाली होती. 9 डिसेंबर 2006 रोजी सुनीता विल्यम्स पहिल्यांदा अंतराळात गेल्या होत्या. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पाठवण्यात आलेले 14 वे शटल डिस्कव्हरीसह त्याचे प्रक्षेपण केल्यानंतर 2012 मध्ये त्यांचा दुसरा अवकाश प्रवास सुरू झाला. त्यानंतर त्याने कझाकस्तानमधून सोयुझ टीएमए-05एम या रशियन रॉकेटवरून उ•ाण केले. सध्या, सुनीता विल्यम्स बोईंगच्या स्टारलायनर स्पेसक्राफ्टवर क्रू फ्लाईट टेस्टअंतर्गत तिसऱ्या मोहीमेसाठी सज्ज आहे.