सुनील मित्तल यांना ब्रिटनचा मानद नाईटहूड पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल हे ‘नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ (केबीइ) ने सन्मानित होणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. ब्रिटनमधील हा सर्वात मोठा सन्मान आहे, ज्याद्वारे परदेशी नागरिकांना मानद पदवी दिली जाते. भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंध सुधारण्यात मदत केल्याबद्दल राजा चार्ल्स तिसरा याने त्यांना मानद नाइटहूड बहाल केला आहे. भारती एअरटेलने लिंक्डइनवर एका पोस्टद्वारे ही माहिती दिली. सुनील मित्तल म्हणाले ‘मी ब्रिटिश सरकारचा आभारी आहे. किंग्ज चार्ल्स यांच्याकडून हा सन्मान मिळाल्याने मला खूप आनंद होत आहे. यूके आणि भारत यांचे ऐतिहासिक संबंध आहेत जे आता वाढीव सहकार्याच्या नवीन युगात प्रवेश करत आहेत. आपल्या दोन महान देशांमधील आर्थिक आणि द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक मजबूत करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. मी ब्रिटिश सरकारचा ऋणी आहे.’ असेही मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.
टागोरांनी नाइटहूडचा सन्मान परत केला
भारतीय साहित्यातील एकमेव नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांना 1915 मध्ये ब्रिटीश सरकारने नाइटहूडने सन्मानित केले होते, परंतु दोन वर्षांनंतर टागोरांनी जालियनवाला बाग हत्याकांडाचा तीव्र निषेध करून आपली पदवी परत केली. सुनील भारती मित्तल हे टेलिकॉम टायकून म्हणून ओळखले जातात, ज्यांची कंपनी देशातील सर्वात मोठ्या मोबाईल फोन ऑपरेटरपैकी एक आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, एअरटेलचे 474 दशलक्ष ग्राहक आहेत. सुनील भारती मित्तल यांना 1988 मध्ये राज्यसभेसाठी नामांकन मिळाले होते.
Home महत्वाची बातमी सुनील मित्तल यांना ब्रिटनचा मानद नाईटहूड पुरस्कार प्रदान
सुनील मित्तल यांना ब्रिटनचा मानद नाईटहूड पुरस्कार प्रदान
वृत्तसंस्था /नवी दिल्ली भारती एंटरप्रायझेसचे संस्थापक आणि अध्यक्ष सुनील मित्तल हे ‘नाइट कमांडर ऑफ द मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ द ब्रिटीश एम्पायर’ (केबीइ) ने सन्मानित होणारे पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. ब्रिटनमधील हा सर्वात मोठा सन्मान आहे, ज्याद्वारे परदेशी नागरिकांना मानद पदवी दिली जाते. भारत आणि ब्रिटनमधील व्यावसायिक संबंध सुधारण्यात मदत केल्याबद्दल राजा चार्ल्स तिसरा […]