सुनील आपटेकर यांचा नैर्त्रुत्य रेल्वेतर्फे सत्कार

बेळगाव : बेळगावचे मि. इंडिया किताब विजेते व रेल्वेचे तिकीट तपासणीस सुनील आपटेकर यांचा रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड व भारतीय रेल्वेच्यावतीने सत्कार करण्यात आला. हुबळी येथे नुकत्याच झालेल्या रेल्वेच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे औचित्य साधून आपटेकर यांचा सत्कार करण्यात आला. शरीरसौष्ठव स्पर्धेत आपटेकर यांनी मि. इंडिया, मि. एशिया असे किताब मिळविले असून त्यांना एकलव्य पुरस्काराने गौरविण्यात आले […]

सुनील आपटेकर यांचा नैर्त्रुत्य रेल्वेतर्फे सत्कार

बेळगाव : बेळगावचे मि. इंडिया किताब विजेते व रेल्वेचे तिकीट तपासणीस सुनील आपटेकर यांचा रेल्वे स्पोर्ट्स प्रमोशन बोर्ड व भारतीय रेल्वेच्यावतीने सत्कार करण्यात आला. हुबळी येथे नुकत्याच झालेल्या रेल्वेच्या शरीरसौष्ठव स्पर्धेचे औचित्य साधून आपटेकर यांचा सत्कार करण्यात आला. शरीरसौष्ठव स्पर्धेत आपटेकर यांनी मि. इंडिया, मि. एशिया असे किताब मिळविले असून त्यांना एकलव्य पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन नैर्त्रुत्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव किशोर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. पुणेरी पगडी, शाल, कवड्याची माळ व तलवार देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सुनील आपटेकर यांनी सर्वांचे आभार मानत तरुणाईला मार्गदर्शन केले. यावेळी अॅड. महिमा आपटेकर, केदार आपटेकर यासह इतर उपस्थित होते.