राज्यात उन्हाळ्याच्या झळा सुरू

राज्यभरात (maharashtra) उन्हाच्या (summer) झळा वाढल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. विदर्भात सरासरी 32 ते 35, मराठवाड्यात सरासरी 33 ते 35, मुंबईसह (mumbai) किनारपट्टीवर 28 ते 30 आणि मध्य महाराष्ट्रात 33 ते 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या वरच्या स्तरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव निर्माण झाला आहे. त्यामुळे थंड वारे राज्यापर्यंत पोहचत नाहीत. दुसरीकडे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात (temperature) वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तापमान आणखी वाढणार सध्या कमाल तापमानात झालेली वाढ आणखी दोन – तीन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर चार – पाच दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. कमाल तापमानात झालेली वाढ पुढील आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी व्यक्त केला आहे.हेही  वाचा सिडकोची घरं 26,000 आणि अर्ज 22,000 एमएमआरच्या आर्थिक विकास योजनेला चालना

राज्यात उन्हाळ्याच्या झळा सुरू

राज्यभरात (maharashtra) उन्हाच्या (summer) झळा वाढल्या आहेत. गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक 37.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. राज्यातील कमाल तापमान सरासरी 33 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. विदर्भात सरासरी 32 ते 35, मराठवाड्यात सरासरी 33 ते 35, मुंबईसह (mumbai) किनारपट्टीवर 28 ते 30 आणि मध्य महाराष्ट्रात 33 ते 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वातावरणाच्या वरच्या स्तरात वाऱ्याची प्रतिचक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांना अटकाव निर्माण झाला आहे. त्यामुळे थंड वारे राज्यापर्यंत पोहचत नाहीत. दुसरीकडे दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे राज्यातील तापमानात (temperature) वाढ झाल्याचे दिसून येत आहे.तापमान आणखी वाढणार सध्या कमाल तापमानात झालेली वाढ आणखी दोन – तीन दिवस कायम राहणार आहे. त्यानंतर चार – पाच दिवस कमाल तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होईल. उत्तरेकडून येणारे थंड वारे आपल्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे तापमान वाढीचा सामना करावा लागत आहे. कमाल तापमानात झालेली वाढ पुढील आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी व्यक्त केला आहे.हेही  वाचासिडकोची घरं 26,000 आणि अर्ज 22,000एमएमआरच्या आर्थिक विकास योजनेला चालना

Go to Source