सुमित नागलचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ माराकेच (मोरोक्को)
एटीपी टूरवरील येथे सुरू असलेला मॅरेकेच खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे पुरुष एकेरीतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे. इटलीच्या सोनेगोने त्याचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले.
पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात 61 व्या मानांकित इटलीच्या सोनेगोने सुमित नागलवर 1-6, 6-3, 6-4 अशी मात केली. या सामन्यात नागलने पहिला सेट जिंकून आघाडी मिळवली होती पण त्यानंतर पुढील दोन सेटमध्ये नागलला आपली सर्व्हिस अधिक वेळ राखता आली नाही. तसेच सोनेगोच्या वेगवान फटक्यासमोर त्याच्याकडून वारंवार चुका झाल्या. गेल्या जानेवारीमध्ये झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सुमित नागलने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवले होते. त्यानंतर या स्पर्धेत नागलने पहिल्या फेरीत कझाकस्तानच्या सिडेड बुबलिकला पराभवाचा धक्का देत दुसरी फेरी गाठली होती पण दुसऱ्या फेरीत त्याला चीनच्या जूनचेंगकडून पराभव पत्करावा लागला होता. सुमित नागल एटीपीच्या ताज्या मानांकन यादीत 95 व्या स्थानावर आहे.
Home महत्वाची बातमी सुमित नागलचे आव्हान समाप्त
सुमित नागलचे आव्हान समाप्त
वृत्तसंस्था/ माराकेच (मोरोक्को) एटीपी टूरवरील येथे सुरू असलेला मॅरेकेच खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत भारताच्या सुमित नागलचे पुरुष एकेरीतील आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे. इटलीच्या सोनेगोने त्याचा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूत स्थान मिळवले. पुरुष एकेरीच्या झालेल्या सामन्यात 61 व्या मानांकित इटलीच्या सोनेगोने सुमित नागलवर 1-6, 6-3, 6-4 अशी मात केली. या सामन्यात नागलने […]
