सुमीत नागलची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ मियामी एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू होणाऱ्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीमध्ये भारताच्या 26 वर्षीय सुमीत नागलने विजयी सलामी दिली आहे. या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग दर्शविणाऱ्या सुमीत नागलने पात्र फेरीच्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात कॅनडाच्या गॅब्रियल डायलोचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला. […]

सुमीत नागलची विजयी सलामी

वृत्तसंस्था/ मियामी
एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू होणाऱ्या मियामी खुल्या पुरूष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी सुरू असलेल्या पात्र फेरीमध्ये भारताच्या 26 वर्षीय सुमीत नागलने विजयी सलामी दिली आहे.
या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभाग दर्शविणाऱ्या सुमीत नागलने पात्र फेरीच्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात कॅनडाच्या गॅब्रियल डायलोचा 7-6 (7-3), 6-2 असा पराभव केला. गेल्या महिन्यात नागलने एटीपीच्या ताज्या मानांकन क्रमवारीत पहिल्या 100 टेनिसपटूंमध्ये स्थान मिळविले होते. सुमीत नागलने अलिकडे चेन्नई खुली टेनिस स्पर्धा जिंकली होती. आता सुमीत नागलचा दुसऱ्या फेरीतील सामना कोलमन वाँगशी होणार आहे. यापूर्वी झालेल्या इंडियन वेल्स बीएनपी पेरीबस मास्टर्स टेनिस स्पर्धेत सुमीत नागलने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविल्यानंतर पहिल्या फेरीत कॅनडाच्या मिलोस रेओनिककडून त्याला पराभव पत्करावा लागला होता. गेल्या जानेवारी महिन्यात झालेल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सुमीत नागलने प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळवित दुसरी फेरी गाठण्याचा पराक्रम केला होता.