सुलतानपूर न्यायालयाचे राहुल गांधींना समन्स

सुलतानपूर न्यायालयाचे राहुल गांधींना समन्स

मानहानीच्या प्रकरणात 2 जुलैला हजर राहण्याचे आदेश
वृत्तसंस्था/ सुलतानपूर
अमित शाह यांच्याबाबत केलेल्या द्वेषपूर्ण वक्तव्य प्रकरणात उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरचे खासदार-आमदार न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 2 जुलै रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. बुधवारी या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने राहुल गांधी यांच्या वकिलाला राहुल गांधी यांच्या उपस्थितीबाबत ‘ते कुठे आहेत?’ अशी विचारणा केली असता राहुल यांचे वकील काशी प्रसाद शुक्ला यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होत असल्यामुळे ते न्यायालयात हजर राहू शकले नाहीत, असे उत्तर दिले. त्यानंतर न्यायालयाने राहुल गांधींना 2 जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीवेळी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीदरम्यान 8 मे 2018 रोजी बेंगळूर येथे पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना हत्येचा आरोपी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्याविरोधात सुलतानपूरमधील भाजप नेत्याने मानहानीचा खटला दाखल केला होता. हा खटला सध्या 5 वर्षे सुरू आहे. यावषी 20 फेब्रुवारी रोजी राहुल याप्रकरणी न्यायालयात हजर झाले होते.