सुखबीर सिंग बादल यांच्यावर प्राणघातक हल्ला, सुवर्ण मंदिराच्या गेटवर गोळीबार

Punjab News: अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात तख्तने शिक्षा भोगत असलेले धार्मिक शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. अमृतसरच्या सुवर्ण मंदिर संकुलात सुखबीर सिंग बादल यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या.

मिळालेल्या माहितीनुसार या प्राणघातक हल्ल्यातून सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले. हल्लेखोर येत असल्याचे पाहून आजूबाजूच्या लोकांनी तातडीने धाव घेत हल्लेखोराला पकडले, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. अकाली तख्त साहिबने घोषित केलेल्या धार्मिक शिक्षेचा भाग म्हणून पक्षप्रमुख सुखबीर सिंग बादल यांच्यासह शिरोमणी अकाली दलाचे नेते 2 डिसेंबरपासून सुवर्ण मंदिरात ‘सेवा’ करत होते. तख्तने शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंग बादल यांना धार्मिक शिक्षा सुनावली आहे. यानंतर गळ्यात फलक लटकवून ते व्हीलचेअरवर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात पोहोचले. या शिक्षेअंतर्गत बादल यांना सुवर्ण मंदिरात ‘सेवादार’ म्हणून काम करावे लागले आणि दारात ड्युटी करण्याबरोबरच लंगरची सेवा करावी लागली.

#WATCH | Punjab: Bullets fired at Golden Temple premises in Amritsar where SAD leaders, including party chief Sukhbir Singh Badal, are offering ‘seva’ under the religious punishments pronounced for them by Sri Akal Takht Sahib, on 2nd December.

Details awaited. pic.twitter.com/CFQaoiqLkx
— ANI (@ANI) December 4, 2024
2007 ते 2017 या काळात शिरोमणी अकाली दल आणि पंजाबमधील त्यांच्या सरकारने केलेल्या ‘चुका’ सांगून अकाल तख्तने सुखबीर सिंग बादल यांना ही शिक्षा दिली आहे. तथापि, सुखबीर सिंग बादल यांच्या पायाला दुखापत झाली आहे आणि त्यामुळे ते 3 डिसेंबरपासून 2 दिवस श्री दरबार साहिब सुवर्ण मंदिरच्या क्लॉक टॉवरच्या बाहेर ड्युटीवर होते.

Go to Source