परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुहास निंबाळकरांची नोंद
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाण्यामध्ये व पाण्याखाली सलग जलयोग करुन विक्रम केलेल्या बेळगावच्या सुहास निंबाळकर यांचा विक्रम परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड येथे नोंदविण्यात आला आहे. बेळगाव अॅक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावचे अध्यक्ष सुहास निंबाळकर यांनी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल गोवावेस बेळगावी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाण्यामध्ये व पाण्याखाली नॉन स्टॉप वॉटर योगा (जल योगा) करून विक्रम केला होता. या विक्रमाची नोंद परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड या संस्थेने घेतली असून नुकतच त्यांना परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संघटनेने प्रमाणपत्र व सन्माचिन्ह देऊन त्यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी आबा स्पोर्टस् क्लब स्पोर्टस क्लब आणि एक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावी यांचे सहकार्य लाभले. जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, सतीश पाटील, विवेक मिसाळ, विनायक अर्कसाली, मुकेश शिंदे, प्रशांत कांबळे, गुऊराज कुलकर्णी, महंतेश नवळगुंद, राजू जागळे,अजित केळवळकर, मिलिंद सांबरेकर, महादेव केसरकर, कल्लप्पा पाटील, आबा स्पोर्टस् क्लब बेळगाव व अॅक्वा डॉल्फिन ग्रुपच्या सदस्यांनी यांनी निंबाळकर जलयोग कार्यक्रमात परिश्रम घेतले होते.
Home महत्वाची बातमी परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुहास निंबाळकरांची नोंद
परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुहास निंबाळकरांची नोंद
बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाण्यामध्ये व पाण्याखाली सलग जलयोग करुन विक्रम केलेल्या बेळगावच्या सुहास निंबाळकर यांचा विक्रम परफेक्ट बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड येथे नोंदविण्यात आला आहे. बेळगाव अॅक्वा डॉल्फिन ग्रुप बेळगावचे अध्यक्ष सुहास निंबाळकर यांनी कॉर्पोरेशन स्विमिंग पूल गोवावेस बेळगावी येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पाण्यामध्ये व पाण्याखाली नॉन स्टॉप वॉटर योगा (जल योगा) करून […]