अन्नोत्सवांतर्गत आज सुफी नाईट कार्यक्रम
बेळगाव : सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या अन्नोत्सवला सोमवारी लक्षणीय गर्दी झाली. या दिवशी प्रामुख्याने शाकाहारी पदार्थांना विशेष मागणी होती. शाकाहारी विभागात अम्रितसरी कुलचा, राजस्थानी दालढोकळा यासह अनेक पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. मांसाहारी विभागात कियॉस्क-2 येथे काश्मिरी गोष्टाबा रिस्ता रोगन जोश, द लखनवी गुलाटी कबाब यांना पसंती मिळाली. अम्युजमेंट पार्कमध्ये मुलांनी मनोरंजनाचा आनंद लुटला. विश्वनाथ या गायकाने अलग ऱ्हदम अंतर्गत बॉलिवूडमधील हिट गाणी सादर करून श्रोत्यांचे मनोरंजन केले. मंगळवारी रात्री सुफी नाईट कार्यक्रम होणार आहे. दरम्यान, मैदानाच्या डाव्या बाजूला किमान 800 कार सामावू शकतील, अशी पार्किंगची मोफत व्यवस्था केली आहे, असे आयोजकांनी कळविले आहे.
Home महत्वाची बातमी अन्नोत्सवांतर्गत आज सुफी नाईट कार्यक्रम
अन्नोत्सवांतर्गत आज सुफी नाईट कार्यक्रम
बेळगाव : सीपीएड मैदानावर सुरू असलेल्या अन्नोत्सवला सोमवारी लक्षणीय गर्दी झाली. या दिवशी प्रामुख्याने शाकाहारी पदार्थांना विशेष मागणी होती. शाकाहारी विभागात अम्रितसरी कुलचा, राजस्थानी दालढोकळा यासह अनेक पदार्थांवर खवय्यांनी ताव मारला. मांसाहारी विभागात कियॉस्क-2 येथे काश्मिरी गोष्टाबा रिस्ता रोगन जोश, द लखनवी गुलाटी कबाब यांना पसंती मिळाली. अम्युजमेंट पार्कमध्ये मुलांनी मनोरंजनाचा आनंद लुटला. विश्वनाथ या […]
