बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर बिर्जे
सचिवपदी जोतिबा हुंदरे, नुतन कार्यकारणीची निवड
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड झाली सुधीर बिर्जे अध्यक्षपदी तर जोतिबा हुंदरे सचिवपदी एक मताने निवड करण्यात आली. सदर बैठकीत कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत मावळते अध्यक्ष विश्वनाथ पाटील अपय्या अपण्णावर, चेतन बुध्दण्णावर, बाहुबली पाटील, अभिजीत पाटील, सुहास पाटील आदी उपस्थित होते. बैठकीत नूतन कार्यकारीणीची निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुधीर हनुमंत बिर्जे, उपाध्यक्ष शिवाजी पाटील, सचिवपदी जोतिबा कृष्णा हुंदरे, खजिनदारपदी ए. जी. मुंर्तुगी यांची एक मताने निवड करण्यात आली. सुधीर बिर्जे हे बेळगावचे ज्येष्ठ पैलवान असून अनेक वर्षे बेळगावच्या मातीत त्यांनी लहान-मोठ्या कुस्त्या केल्या. त्यानंतर त्यांनी कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकारीपदी काम पाहिले.
गेली आठ वर्षे त्यांनी संघटनेच्या सचिवपदी काम करून अनेक कुस्ती मैदान भरविण्याचा सिंहाचा वाटा उचलला. लहानपणापासून आपल्या वडीलांच्या पाऊलावर पाऊल ठेवून कुस्तीमध्ये प्रवेश केला. कर्नाटक केसरी, विनायक दावणगिरी यांचा पराभव करून ती नावासरूपास आले. एमबीए शिक्षण पूर्ण करून त्यांनी खासगी कंपनीत काम करीत कुस्तीकडेही लक्ष दिले आहे. आता त्यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. शिवाजी पाटील हे ही कुस्तीपटू असून त्यांनी अनेक कुस्ती मैदान गाजविले आहे. सध्या ते होलसेल भाजीमार्केटचा व्यवसाय सांभाळत त्यांनी कुस्तीकडेही लक्ष दिले आहे. जोतिबा हुंदरे यांची सचिवपदी निवड झाली असून आपल्या कुस्ती जीवनाबरोबर आपला व्यवसायाबरोबर कुस्तीपटूंकडे लक्ष देत अनेक वर्षे कार्य केले आहे. लाल मातीतील हा पैलवान आता कुस्ती मैदाने भरविण्यासाठी सज्ज झाला असून ज्येष्ठ सभासदांकडून अनुभव घेत पुढील कुस्ती मैदानेही यशस्वी करण्यासाठी त्यांचे प्रयत्न राहणार आहेत.
Home महत्वाची बातमी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर बिर्जे
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी सुधीर बिर्जे
सचिवपदी जोतिबा हुंदरे, नुतन कार्यकारणीची निवड बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या बैठकीत नूतन कार्यकारणीची निवड झाली सुधीर बिर्जे अध्यक्षपदी तर जोतिबा हुंदरे सचिवपदी एक मताने निवड करण्यात आली. सदर बैठकीत कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत मावळते अध्यक्ष विश्वनाथ पाटील अपय्या अपण्णावर, चेतन बुध्दण्णावर, बाहुबली पाटील, अभिजीत पाटील, सुहास पाटील […]