साहित्य संमेलन अध्यक्षपदी सुधाकर जोगळेकर

प्रतिनिधी/ बेळगाव नांदेड येथे सातवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन येत्या 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगाव येथील साहित्यिक सुधाकर जोगळेकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती चौक, पूर्णा रोड, नांदेड येथे संमेलन होणार आहे. सुधाकर जोगळेकर हे बेळगावमधील विद्रोही साहित्यिक, कवी व परखड वक्ते आहेत. ‘स्फोट’ आणि […]

साहित्य संमेलन अध्यक्षपदी सुधाकर जोगळेकर

प्रतिनिधी/ बेळगाव
नांदेड येथे सातवे अखिल भारतीय गुरु रविदास साहित्य संमेलन येत्या 10 मार्च रोजी आयोजित करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगाव येथील साहित्यिक सुधाकर जोगळेकर यांची निवड करण्यात आली आहे. छत्रपती चौक, पूर्णा रोड, नांदेड येथे संमेलन होणार आहे.
सुधाकर जोगळेकर हे बेळगावमधील विद्रोही साहित्यिक, कवी व परखड वक्ते आहेत. ‘स्फोट’ आणि ‘विस्फोट’ हे त्यांचे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘विद्रोही बोधीसत्व गुरु रविदास’ या विषयावरील त्यांचा शोधप्रबंध लवकरच प्रकाशित होणार आहे. सामाजिक समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पदयात्रा काढल्या आहेत.