करंबळ मैदानात सुदेश ठाकुरची बाजी

वार्ताहर /नंदगड करंबळ (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात हरियाणा केसरी रोहिल नांगलला दुखापत झाल्याने सातव्या मिनिटाला सुदेश ठाकुरला विजयी घोषित करण्यात आले. पंच म्हणून डी. एम. भोसले व हणमंत गुरव यांनी काम पाहिले. या कुस्ती आखाड्यात 50 हून अधिक आकर्षक कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार विठ्ठल […]

करंबळ मैदानात सुदेश ठाकुरची बाजी

वार्ताहर /नंदगड
करंबळ (ता. खानापूर) येथील ग्रामदेवता श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त सोमवारी आयोजित केलेल्या भव्य कुस्ती मैदानात हरियाणा केसरी रोहिल नांगलला दुखापत झाल्याने सातव्या मिनिटाला सुदेश ठाकुरला विजयी घोषित करण्यात आले. पंच म्हणून डी. एम. भोसले व हणमंत गुरव यांनी काम पाहिले. या कुस्ती आखाड्यात 50 हून अधिक आकर्षक कुस्त्या झाल्या. प्रथम क्रमांकाची कुस्ती आमदार विठ्ठल हलगेकर, अरविंद पाटील, सदानंद पाटील, सातेरी घाडी, महादेव घाडी, अभियंते संभाजी पाटील, के. एम. घाडी, मारुती घाडी, शिवाजी पाटील, हणमंत गुरव, पांडुरंग पाटील, प्रल्हाद पाटील, सदानंद पाटील, राजाराम पाटील, नामदेव गुरव, जयंत पाटील, रविकिरण पाटील यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला सुदेश ठाकुरने एकेरी पट काढून रोहित नांगलला खाली घेत घीस्सा मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी रोहितला गंभीर दुखापत झाल्यामुळे सुदेश ठाकुरला पंचांनी विजयी घोषित केले.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती वारणा केसरी भगत खोत विरुद्ध कीर्ती कुमार कार्वे ही कुस्ती लक्ष्मण बामणे, रामचंद्र पाटील, उदय भोसले, राजाराम गुरव, हणमंत गुरव, सुरेश पाटील, पांडुरंग पाटील, डी.एम. भोसले, रामचंद्र पाटील, नारायण पाटील,सातेरी घाडी, गणपती मादार यांनी लावली. पहिली 12 मिनिटे दोघांनीही एकमेकाची ताकद आजमावली. 13 व्या मिनिटाला किर्ती कुमारने हप्ता लावण्याचा प्रयत्न केला. परंतु भगत खोतने परतावून लावला. त्यानंतर कीर्ती कुमारने पायाला आकडी लावून भगत खोतवर ताबा घेतला व एकचाक डावाचा प्रयत्न केला. शेवटी हप्ते भरून पायाला आकडी मारुन भगतला चीत करत कीर्तीकुमार विजयी झाला. पंच म्हणून पांडुरंग पाटील यांनी काम पाहिले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत कामेश कंग्राळी विरुद्ध ऋषभ पट्टणकुडी यांच्यात कुस्ती लावण्यात आली. सुरुवातीला कामेशने ताबा घेतला होता. पण वृषभने सुटका करुन घेतली. त्यानंतर मानेवर घुटना ठेऊन मानेचा कस काढला. व घुटण्यावर फिरवून कामेशला चारीमुंड्या चीत केले.
चौथी कुस्ती कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव विरुद्ध मोहन नारे निपाणी यांच्यात झाली. या कुस्तीत सुरुवातीला दोन्ही पैलवानांनी आपापले कौशल्य दाखवून प्रतिस्पर्ध्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. प्रेम जाधवने एकेरी पट काढत मोहन नारेला खाली घेत पायाला एकलांगी भरुन एकलांगीवर विजयी मिळविला. पाचव्या कुस्तीत शुभम सांगली विरुद्ध महेश तीर्थकुंडे यांची कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली. वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. विठ्ठल चिले विरूद्ध रोहित पाटील, शिवा द•ाr विरुद्ध शिवय्या पुजारी, कुबेर पिरनवाडी विरूद्ध सुधीर बेटगेरी यांच्यातील कुस्त्याही बरोबरीत राहिल्या. या मैदानात रोहित तीर्थकुंडे, ओमकार पाटील राशीवडे, पार्थ पाटील कंग्राळी, विनायक गुरव बेकवाड, प्रज्ञानंद शेनोळी, साईनाथ चापगाव, प्रतीक पाटील कंग्राळी, पांडुरंग नाईक तुर्केवाडी, सार्थक नाईक तुर्केवाडी, ज्योतिबा मंगळवेढा, पृथ्वीराज कंग्राळी, पवन चिखली यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला. करंबळ येथील आदित्य पाटीलने प्रतिस्पर्ध्यावर प्रेक्षणीय विजय मिळवून वाहव्वा मिळवली. पंच म्हणून डी. एम. भोसले, जयवंत खानापूरकर, मोहन पाटील, राजाराम गुरव, यशवंत अल्लोळकर, सुदेश पाटील, अर्जुन देसाई, सुरेश पाटील, भगवंत पाटील, नामदेव गुरव यांनी काम पाहिले. कुस्त्यांचे समालोचन कृष्णा चौगुले राशिवडे यांनी केले.