बेकवाड येथील लक्ष्मीदेवीच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी
वार्ताहर /नंदगड
बेकवाड येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा बुधवार दि. 28 ते बुधवार दि. 6 मार्चपर्यंत चालणार आहे. तब्बल आठ दिवस होणाऱ्या या यात्रेसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्रोत्सव कमिटीतर्फे देवीच्या विवाह सोहळ्याची तयारी जोरात करण्यात येत आहे. बेकवाड येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा तब्बल 18 वर्षानंतर होत आहे. गावच्या वेशीत असलेल्या मंदिरासमोर देवीच्या विवाह सोहळ्यासाठी मंडप घालण्यात आला आहे. बेकवाड येथे एक सिंहावर विराजमान झालेली व दुसरी वाद्यावर विराजमान झालेली अशा दोन लक्ष्मी देवीच्या मूर्ती आहेत. दोन्ही लक्ष्मी देवीचा विवाह एकाच वेळी बुधवारी पहाटे होणार आहे. लक्ष्मी यात्रा होणार असल्याने प्रत्येक घराला रंगरंगोटी करण्यात आली आहे. आपल्याच घरातील एखाद्या मुलीचा लग्नसमारंभ असावा, असे गावात प्रवेश केल्यानंतर वाटत आहे. सर्वत्र स्वच्छतेला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. यात्रेसाठी माहेरवासिनी व पै पाहुणे दाखल झाले आहेत. गावच्या पूर्वेला असलेल्या गदगेवर भव्य शामियाना उभारण्यात आला आहे.
Home महत्वाची बातमी बेकवाड येथील लक्ष्मीदेवीच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी
बेकवाड येथील लक्ष्मीदेवीच्या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी
वार्ताहर /नंदगड बेकवाड येथील ग्रामदेवता लक्ष्मीदेवीची यात्रा बुधवार दि. 28 ते बुधवार दि. 6 मार्चपर्यंत चालणार आहे. तब्बल आठ दिवस होणाऱ्या या यात्रेसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. यात्रोत्सव कमिटीतर्फे देवीच्या विवाह सोहळ्याची तयारी जोरात करण्यात येत आहे. बेकवाड येथील श्री लक्ष्मीदेवीची यात्रा तब्बल 18 वर्षानंतर होत आहे. गावच्या वेशीत असलेल्या मंदिरासमोर देवीच्या विवाह सोहळ्यासाठी मंडप […]