जलतरण स्पर्धेत स्विमर्स व अॅक्वेरिअस क्लबच्या जलतरणपटूंचे यश

सुनिधी, समृध्दी हलकारे, निधी कुलकर्णी यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित एनआरजे राज्यस्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनीयर एक्वेटीक जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेत 6 सुवर्ण, 4 रौप्य व 6 कास्यपदकासह एकूण 16 पदकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले आहे. सुनिधी हलकारे, समृध्दी हलकारे व निधी कुलकर्णी यांची […]

जलतरण स्पर्धेत स्विमर्स व अॅक्वेरिअस क्लबच्या जलतरणपटूंचे यश

सुनिधी, समृध्दी हलकारे, निधी कुलकर्णी यांचे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : बेंगळूर येथे कर्नाटक राज्य जलतरण संघटना आयोजित एनआरजे राज्यस्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर व सिनीयर एक्वेटीक जलतरण स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व एक्वेरियस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेत 6 सुवर्ण, 4 रौप्य व 6 कास्यपदकासह एकूण 16 पदकांची कमाई करीत घवघवीत यश संपादन केले आहे. सुनिधी हलकारे, समृध्दी हलकारे व निधी कुलकर्णी यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
बेंगळूर येथील बसवणगुडी अॅक्वेटीक सेंटरच्या जलतरण तलावात घेण्यात आलेल्या एनआरजे राज्यस्तरीय सबज्युनिअर, ज्युनिअर व सिनीअर अॅक्वेटीक स्पर्धेत बेळगावच्या स्विमर्स व अॅक्वेरिअस क्लबच्या जलतरणपटूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये वेदांत मिसाळेने 3 सुवर्ण, निधी कुलकर्णी 1 सुवर्ण, 3 रौप्य, अद्वैत दळवीने 1 सुवर्ण, 4 कास्य, सुनिधी हलकारेने 1 सुवर्ण तर समृध्दी हलकारेने 1 सुवर्ण व 2 कास्य पदके पटकाविली. या स्पर्धेत राज्यातील जवळपास 1 हजाराहून अधिक जलतरणपटूंनी भाग घेतला होता.
ओडीशातील भुवनेश्वर येथे होणाऱ्या सबज्युनिअर, ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी सुनिधी हलकारे, समृध्दी हलकारे, निधी कुलकर्णी यांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल कर्नाटक राज्य जलतरण संघात त्यांची निवड करण्यात आली. यापूर्वीही या तिघींनी राष्ट्रीय स्पर्धेत भाग घेवून यश संपादन केले होते. या सर्व जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कुडुचकर, गोवर्धन काकतीकर, इम्रान उचगावकर, विनायक आंबेवाडकर यांचे मार्गदर्शन लाभत असून स्वीमर्स व एक्वेरियस क्लबच्या सभासदांचे प्रोत्साहन लाभत आहे.