कांटस् बॅडमिंटनपटूंचे स्पर्धेत यश
आराध्या, लक्ष्मीकांत, विनायक विजेते
बेळगाव : बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कांटस् बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडू आराध्या कनगुटकर, लक्ष्मीकांत नेतलकर, विनायक असुंडी विजेते. साईश नेतलकर, अभिलाश असुंडी उपविजेते. बेळगाव क्लबच्या सभागृहात बेळगाव क्लब चषक बॅडमिंटन स्पर्धेत कांत बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये 17 वर्षांखालील मुलींच्या गटात आराध्य कनगुटकरने पहिल्या फेरीत ऋतुजाचा 30-13, दुसऱ्या फेरीत अर्णविचा 21-18, 21-16 तर अंतिम फेरीत तन्वीचा 21-13, 21-18 असा पराभव करुन विजेतेपद पटकाविले. मुलांच्या 15 वर्षांखालील गटात अभिलाश असुंडीने पहिल्या फेरीत साईशचा 30-16, उपांत्यफेरीत नमन एच.चा 21-18, 19-21, 21-19 अशा सेटमध्ये पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली. मात्र अंतिम फेरीत रणवीर मोहीरेकडून पराभव पत्करावे लागले. त्याने 21-19, 21-18 अशा सरळ गुणफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले.
अभिलाशला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. साईशने नेतलकरने 17 वर्षांखालील मुलाच्या गटात पहिल्या फेरीत रिद्नेश जी.चा 30-16, उपांत्यफेरीत प्रितम एच.चा 21-11, 21-6 असा पराभव करुन अतिम फेरी गाठली. मात्र अंतिम फेरीत वृशंककडून साईशला 21-16, 21-17 अशा गुण फरकाने पराभव पत्करावा लागला. साईशला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. 40 वर्षांवरील गटात लक्ष्मीकांत नेतलकर व विनायक असुंडी या जोडीने डॉ. विकास पै व अजय असुंडी या जोडीचा 21-15, 21-11 अशा गुणफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या सर्व खेळाडूंना बॅडमिंटन प्रशिक्षक लक्ष्मीकांत नेतलकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Home महत्वाची बातमी कांटस् बॅडमिंटनपटूंचे स्पर्धेत यश
कांटस् बॅडमिंटनपटूंचे स्पर्धेत यश
आराध्या, लक्ष्मीकांत, विनायक विजेते बेळगाव : बेळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटना आयोजित जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत कांटस् बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडू आराध्या कनगुटकर, लक्ष्मीकांत नेतलकर, विनायक असुंडी विजेते. साईश नेतलकर, अभिलाश असुंडी उपविजेते. बेळगाव क्लबच्या सभागृहात बेळगाव क्लब चषक बॅडमिंटन स्पर्धेत कांत बॅडमिंटन अकादमीच्या खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यामध्ये 17 वर्षांखालील मुलींच्या गटात आराध्य कनगुटकरने पहिल्या फेरीत ऋतुजाचा 30-13, […]