डी. टी. देसाई स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

बेळगाव : फ्लाईंग फिट कराटे अकादमीच्यावतीने गुजरात भवन येथे आयोजित इंटर डोजो कराटे चॅम्पियनशिप 2024 मध्ये डी. टी. देसाई पब्लिक स्कूल, आदर्शनगर हिंदवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. गटामध्ये नवीन शिरोळी, शौर्य पाटील आणि बसूलिंग पुजारी यांना रौप्यपदक मिळाले. सुरभी चापगाव, खुशी पोडप्पणावर, समर्थ अरळीमठ, प्रितम कम्मार, अनन्या माळी, आरुष शिंदे आणि अरफा हवालदार […]

डी. टी. देसाई स्कूलच्या विद्यार्थ्यांचे यश

बेळगाव : फ्लाईंग फिट कराटे अकादमीच्यावतीने गुजरात भवन येथे आयोजित इंटर डोजो कराटे चॅम्पियनशिप 2024 मध्ये डी. टी. देसाई पब्लिक स्कूल, आदर्शनगर हिंदवाडी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनिय कामगिरी केली आहे. गटामध्ये नवीन शिरोळी, शौर्य पाटील आणि बसूलिंग पुजारी यांना रौप्यपदक मिळाले. सुरभी चापगाव, खुशी पोडप्पणावर, समर्थ अरळीमठ, प्रितम कम्मार, अनन्या माळी, आरुष शिंदे आणि अरफा हवालदार यांना कांस्यपदक मिळाले. कुमितेमध्ये प्रितम कम्मारने प्रथम क्रमांक पटकावला. खुशी पोडप्पानावर,समर्थ आरळीमठ, अरफा हवालदार यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या सर्व खेळाडूंना  शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा देसाई यांचे मार्गदर्शन मिळाले.