राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सचे यश

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 61 व्या नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटरनी 1 सुवर्ण 6 कांस्य पदके जिंकून चमक दाखवली. चेन्नई आणि चंदीगड येथे 4 ते 25 डिसेंबर दरम्यान  घेण्यात आलेल्या स्पर्धेत पदक विजेत्या स्केटरचे नाव   स्पीड स्केटिंग-सई पाटील 1 सुवर्ण, फ्री स्टाईल स्केटिंग स्पर्धेत जयध्यान राज […]

राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सचे यश

बेळगाव : रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आयोजित 61 व्या नॅशनल रोलर स्केटिंग स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटरनी 1 सुवर्ण 6 कांस्य पदके जिंकून चमक दाखवली. चेन्नई आणि चंदीगड येथे 4 ते 25 डिसेंबर दरम्यान  घेण्यात आलेल्या स्पर्धेत पदक विजेत्या स्केटरचे नाव   स्पीड स्केटिंग-सई पाटील 1 सुवर्ण, फ्री स्टाईल स्केटिंग स्पर्धेत जयध्यान राज 1 कांस्य, देवेन बामणे 1 कांस्य, अल्पाइन आणि डाउनहिल स्पर्धेत साईराज मेंडके 1 कांस्यपदक पटकाविले. रोलर डर्बी स्केटिंगमध्ये शेफाली शंकरगौडा 1 कांस्य, खुशी घोटीवरेकर 1 कांस्य पदक पटकाविले. रोलर हॉकी स्पर्धेत मानसी बेविनकत्तीने 1 कांस्यपदक मिळविले. स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, विशाल वेसणे, मंजुनाथ मंडोळकर, विठ्ठल गगणे, अनुष्का शंकरगौडा आणि विश्वनाथ येळ्ळूरकर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले आहे.